झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका देवमाणूसचा रविवारी दोन तासांचा विशेष भाग दाखवण्यात आला. या महाएपिसोडने मालिकेची सांगता झाली. मात्र मालिका निरोप घेत असताना अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवली. त्यामुळे प्रेक्षक बुचकाळ्यात पडले आहेत. ज्यावेळेस ही मालिका सुरू झाली त्यावेळेस वाई तालुक्यातील घटनेशी याचा संबंध आहे असे बोलले जात होते. वास्तवात या घटनेशी निगडित असलेला डॉ. संतोष पोळ हा पोलिसांच्या अटकेत आहे आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांवर कोर्टात केस देखील चालू आहे.
देवमाणूस ही मालिका देखील सुरू आजीच्या डायलॉगबाजीमुळे आणि बज्या, नाम्या, टोण्याच्या विनोदामुळे खूपच गाजली. मालिका गेल्या वर्षी १६ ऑगस्टला झी वाहिनीवर दाखल झाली होती आणि आता बरोबर एक वर्षाने ही मालिका संपली देखील . मात्र मालिकेचा शेवट प्रेक्षकांचा हिरमोड करणारा ठरला.
जो डॉक्टर इतक्या जणींना आपल्या जाळ्यात ओढतो, इतक्या जणांची फसवणूक करतो, गावकऱ्यांना अंधारात ठेवून स्वतःला देवमाणूस म्हणवतो त्या डॉक्टरचा शेवटही अगदी तसाच होणे अपेक्षित होते, अशी चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. मालिकेच्या शेवटी डॉक्टरला अटक होणे अपेक्षित होत, वाईट कामात मदत करणारी डिंपल पोलिसांच्या तावडीत सापडली नाही, बज्याचा एका बुक्कीतच म्हणून या सर्व वाईट कृत्याचा बदला घेणारा डायलॉग फक्त डायलॉगच बनून गेला, नाम्याचे लग्न स्वप्नच बनून राहिले..प्रत्यक्षात या सर्वांचा विचार मालिकेत केला गेला नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे.