Join us  

'गोपी बहू' च्या घरी गणरायाचं आगमन, पती शहनवाजसोबत केली बाप्पाची आरती; नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 11:11 AM

देवोलिना प्रेग्नंट असून लवकरच पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

टेलिव्हिजनवर 'गोपी बहू' म्हणून ओळख मिळवलेली अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने (Devoleena Bhattacharjee) डिसेंबर २०२२ साली शहनवाज शेखसोबत लग्न केले. देवोलिना गरोदर असून पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आंतरधर्मीय विवाह केल्याने तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. आता देवोलिनाने पतीसोबत गणरायाचं घरी स्वागत केलं आहे. मुस्लिम असून शहनवाजने घरी गणरायाची मूर्ती स्थापन केल्याने आता त्याचं कौतुक होत आहे.

देवोलिनासाठी यंदाचा गणेशोत्सव खास आहे. गणरायाच्या आशीर्वादाने ती लवकरच आई होणार आहे. देवोलिनाची गणपतीवर श्रद्धा आहे. तिच्या आयुष्यातील चढ उतारात बाप्पाावरच्या भक्तीमुळेच ती त्यातून पुढे आली. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती घरात बाप्पाचं स्वागत करत आहे. सोबतच तिचा पती शहनवाज शेख गणरायाची मूर्ती घरी घेऊन येत आहे. तर देवोलिना फुलांची सजावट आणि पूजेची तयारी करत आहे. 

तिच्या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांचं दोघांचं कौतुक केलं आहे. 'दुसऱ्या धर्माचा असूनही तो तुला किती सपोर्ट करतो हेच आम्हाला तुमच्याबद्दल आवडतं' अशी कमेंट एकाने केली आहे. देवोलिनाने १५ ऑगस्ट रोजी तिच्या प्रेग्नंसीचा उलगडा केला. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 

टॅग्स :गणेशोत्सव 2024सेलिब्रिटी गणेशदेवोलिना भट्टाचार्जी