Join us

"मी मरता मरता वाचले", प्री वेडिंग शूटसाठी हिमालयात गेलेल्या अभिनेत्रीची झाली 'अशी' अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 3:56 PM

हिमालयात बेशुद्ध अवस्थेत असताना अभिनेत्रीचं प्री वेडिंग शूट, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'देवो के देव महादेव फेम' अभिनेत्री आर्या वोरा काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकली. २६ फेब्रुवारीला आर्याने बॉयफ्रेंड रंजीतसह सात फेरे घेतले. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, लग्नापेक्षा आर्या आणि रंजीतच्या प्री वेडिंगची चर्चा रंगली होती. आर्याने हिमालयात जाऊन खास प्री वेडिंग शूट केलं होतं. या प्री वेडिंग शूटच्या BTS व्हिडिओ आर्याने शेअर केला आहे. 

आर्याने हिमालयातील स्पिटी व्हॅली येथे प्री वेडिंग शूट केलं होतं. पण, २२ डिग्री सेल्सिअसमध्ये प्री वेडिंग शूट करताना हायपोथर्मियामुळे अभिनेत्रीची हालत खराब झाली होती. इन्स्टाग्रामवरुन आर्याने शेअर केलेल्या व्हिडिओत थंडीमुळे ती बेशुद्ध होत असल्याचं दिसत आहे. तरीदेखील अभिनेत्री प्री वेडिंगसाठी पु्न्हा काळ्या रंगाच्या स्ट्रिपलेस गाऊनमध्ये शूट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत आर्याने प्री वेडिंग शूट करताना ती मरता मरता वाचली असल्याचं म्हटलं आहे. 

आर्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एकाने कमेंट करत "यासाठी शिक्षण आणि सामान्य ज्ञान गरजेचं आहे", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "फोटो इतके महत्त्वाचे आहेत?" अशी कमेंट केली आहे. "हे फक्त प्री वेडिंगसाठी करत आहे?" असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग