Join us

DP चा मोठा निर्णय! अंकिता-अभिजीतची साथ सोडणार, निक्कीजवळ खंत व्यक्त करत म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:29 PM

DP दादाने मोठा निर्णय घेतला असून त्याने निक्कीजवळ मनातली खंत व्यक्त केलीय (bigg boss marathi 5)

 'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्य आपला खेळ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. खेळ दाखवताना कधी कोण कोणाचा गेम पलटवतं हे सांगू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त खेळ दाखवत पुढे आलेल्या बी टीममध्ये मात्र चांगलीच फूट पडताना दिसणार आहे. B ग्रुपमधील महत्वाचा सदस्य DP दादाने अंकिता-अभिजीतची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. काय झालंय बघा

DP आता स्वतंत्रपणे खेळणार?

डीपी दादांनी त्यांचा खेळ दिसत नसल्याने स्वतंत्र खेळण्याचा निर्णय घेतलेला आजच्या भागात पाहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये डीपी दादा आणि निक्की चर्चा करताना दिसत आहे. डीपी दादा म्हणत आहे,"मी कोणत्याही टीमचा भाग नाही आहे. स्टॅटर्जीच्या बाबतीत कोण बोलत होतं". त्यावर संग्राम डीपी दादांचं नाव घेतो. तर निक्की म्हणते,"पण दिसलं नाही ना". डीपी दादा पुढे म्हणतो,"अभिजीत आणि अंकितामुळे मी सावली झालो".

DP दादा कसं खेळणार?

डीपी दादा पुढे म्हणतात,"मला जर दिसायचंय तर मी तुमच्यात खेळू शकत नाही". नेहमी अंकिताच्या पाठीशी असणारे, तिला वेळोवेळी सल्ले देणारे डीपी दादा आता एकटं खेळताना दिसून येणार आहेत. डीपी दादा कसा खेळ खेळणार याकडे आता 'बिग बॉस प्रेमीं'च्या नजरा लागल्या आहेत. DP दादांच्या या निर्णयाने काल अंकिता चांगलीच उदास झालेली दिसली. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन