बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन, टास्क, भांडणं या सर्वांमधून वेळ काढत घरातले सदस्य निवांत गप्पाही मारताना दिसतात. बिग बॉस मराठीच्या घरात हलकंफुलकं वातावरण क्वचितच दिसतं. असाच एक छान प्रसंग घरात घडलाय. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं. त्यावेळी कोल्हापूरचा रांगडा गडी DP अर्थात धनंजय पोवारने निक्कीला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
DP ने कोल्हापूरी अंदाजात निक्कीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बिग बॉसच्या प्रोमोत दिसतं की धनंजय घरातील एक कुंडी घेऊन ती निक्कीला देतो. पुढे गुडघ्यावर बसून तो निक्कीला म्हणतो, "विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम जियो फक्त ७५ वर्ष. का सांगतो तुला. असंच तुझं तारुण्य टिकून ७५ वर्ष जग. असंच लोकांना आनंद दे. असं लोकांना छळू नको. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना दुःख, त्रास काय देऊ नकोस. त्यांच्या नरड्यावर पाय देऊन उभं राहून तू जिंक पण त्यांना मानसिक त्रास काय देऊ नकोस. तुला लक्ष लक्ष कोटी कोटी वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक साधा सुधा एक पलीकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस."
हे ४ सदस्य या आठवड्यात नॉमिनेट
धनंजयच्या शुभेच्छा ऐकून सर्वजण हसायला लागतात. पुढे घरातले सदस्या निक्कीला मिठी मारत तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देतात. काहीवेळ का होईन सर्वांच्या चेहऱ्यावर रुसवेफुगवे विसरुन निक्कीसाठी स्माईल असतं. काल बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झाला. या टास्कमध्ये कार्याअंती अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा आणि आर्या जाधव हे चौघेजण या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले.