Join us

चहल 'त्या' तरुणीसोबत दिसताच धनश्रीने काय केलं, क्रिकेटरसोबतचे डिलीट केलेले रोमँटिक फोटो पुन्हा केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:45 IST

कहाणी में ट्विस्ट! एकीकडे घटस्फोट तर दुसरीकडे धनश्री वर्माने Unarchive केले चहलसोबतचे वेडिंग फोटो

भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल त्याच्या वैवाहिक जीवनामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोट घेत वेगळे होणार आहेत. त्यांनी घटस्फोटासाठी अर्जदेखील दाखल केला आहे. अशातच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये चहल एका तरुणीसोबत दिसला. चहलने RJ महावशसोबत भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनलला हजेरी लावली होती. चहलचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनश्रीने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता चहल आणि धनश्रींच्या कहाणीत मोठा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे. 

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान धनश्रीने सोशल मीडियावरुन चहलसोबतचे सगळे फोटो डिलिट केले होते. आता चहलचे त्या तरुणीसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनश्रीने क्रिकेटरसोबत डिलिट केलेले सगळे फोटो पुन्हा शेअर केले आहेत. धनश्रीने चहलसोबतचे सगळे फोटो Archieved केले होते. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर चहलसोबतचा एकही फोटो दिसत नव्हता. मात्र, आता ते सगळे फोटो तिने Unarchieve केले आहेत. त्यामुळे या दोघांचं नेमकं चाललंय काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

धनश्रीची इन्स्टाग्राम पोस्ट

युझवेंद्र चहल एका तरुणीसोबत एकत्र दिसल्यानंतर धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सूचक स्टोरी पोस्ट केली आहे. तिने स्टोरीमध्ये लिहलं, "स्त्रीयांना दोष देणे ही कायमच फॅशन राहिलेली आहे". यावरुन चहलने धनश्रीला धोका दिलाय का, असे त्यांचे चाहते विचारत आहेत. 

युजवेंद्र आणि धनश्रीने अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २०२० मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. पण, आता लग्नाच्या चार वर्षानंतर दोघे वेगळे होत असल्याची चर्चा सुरू आहेत. युजवेंद्र आणि धनश्री या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. युजवेंद्रनं इन्स्टाग्रामवरील धनश्रीसोबतचे फोटो डिलीट केले आहेत. दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

टॅग्स :युजवेंद्र चहलऑफ द फिल्डटिव्ही कलाकार