Join us

​ध्रुव भंडारी आणि श्रुती मर्चंट अडकले लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2017 8:49 AM

तेरे शहर में या मालिकेमुळे नावारूपाला आलेला धुव्र भंडारी नुकताच विवाहबंधनात अडकला. त्याने श्रुती मर्चंटसोबत लग्न केले. श्रुती ही ...

तेरे शहर में या मालिकेमुळे नावारूपाला आलेला धुव्र भंडारी नुकताच विवाहबंधनात अडकला. त्याने श्रुती मर्चंटसोबत लग्न केले. श्रुती ही प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंटची लहान बहीण आहे तर धुव्र हा प्रसिद्ध अभिनेते मोहन भंडारी यांचा मुलगा आहे. मोहन भंडारी यांनी नव्वदीच्या दशकात अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांची कर्ज ही मालिका तर खूप गाजली होती. धुव आणि श्रुती गेल्या दोन वर्षांपासून नात्यात आहे. ताज एक्सप्रेस या बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्टच्या दरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. धुव्र आणि श्रुती हे एकाच कॉलेजमध्ये शिकले असले तरी कॉलेजमध्ये त्यांनी एकमेकांना कधीच पाहिले नव्हते. ताज एक्सप्रेसच्या चित्रीकरणाच्या दरम्यान धुव्र श्रुतीला पाहाताच तिच्या प्रेमात पडला होता. पण त्यांनी त्यांचे प्रेमप्रकरण नेहमीच मीडियापासून लपवून ठेवले. त्यांनी लग्नाबाबत देखील मौन राखणेच पसंत केले होते. पण त्याने आता लग्नाबाबत सगळ्यांना सांगितले आहे.धुव्र आणि श्रुतीने मॉरिशिअसमध्ये लग्न केले आहे. धुव्र सांगतो, 20 जूनला आम्ही जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही साखरपुडा केला तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही बीच पार्टी दिली. आम्ही सगळे मिळून खूप नाचलो. धुव्रचे वडील प्रसिद्ध अभिनेते मोहन भंडारी यांचे निधन काही वर्षांपूर्वी झाले. लग्नाच्या दिवशी धुव्रने त्याच्या वडिलांना खूप मिस केले. श्रुती आणि मोहन भंडारी यांचे बाँडिगदेखील खूप छान होते. ते दोघे जुनी हिंदी गाणी एकत्र ऐकत असत. श्रुती ही खूप चांगली मुलगी आहे, तिची तू काळजी घे असेदेखील त्यांनी ध्रुवला मृत्युपूर्वी सांगितले होते.