Join us  

Bigg Boss 17 मध्ये अंकिता आणि विकीने घेतला घटस्फोट घेण्याचा निर्णय?, म्हणाले - "इथेच जाहीर करुयात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 7:35 PM

Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉस १७ अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. दरम्यान, प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. एकीकडे काही लोकांची नाती बदलत असताना दुसरीकडे अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील भांडण काही संपताना दिसत नाही आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉस १७ (Bigg Boss 17) अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. दरम्यान, प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. एकीकडे काही लोकांची नाती बदलत असताना दुसरीकडे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्यातील भांडण काही संपताना दिसत नाही आहेत. शोच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अंकिता आणि विकीमध्ये अनेक मतभेद झाले आहेत. पण गेल्या एपिसोडमध्ये दोघांमध्ये एवढा दुरावा निर्माण झाला आहे की, दोघांनी मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

खरे तर गेल्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे पती विकी जैनच्या काही वर्तणूकीमुळे पुन्हा संतापलेली दिसली. अंकिता विक्कीवर रागावून तिच्या खोलीत बसली. यावेळी विकी तिच्याजवळ जाऊन तिचा राग काढण्याचा प्रयत्न करत होता. पण अंकिता त्याला सुनावताना दिसली. दरम्यान, अंकिताने विकीला सांगितले की मला वाटते आता आपल्या नात्यात काहीच उरले नाही. मला असे वाटते की आपले नाते आता विषारी बनत चालले आहे. जेवताना विकी अंकिताच्या या गोष्टी ऐकत असतो. नंतर अंकिता म्हणते की, विकी आपल्यात असलेले प्रेम कमी होत आहे. खूप काही घडले आहे. त्यामुळे आता त्याची गरज नाही. आता मला वाटत नाही की आपल्याला एकमेकांची गरज आहे किंवा आपण एकमेकांवर प्रेम करतो.

अंकिताला विकीसोबत घ्यायचाय घटस्फोट?विकी मूकपणे अंकिताच्या या गोष्टी ऐकतो पण मग तो चिडतो आणि अंकिताला म्हणतो की, तुला घटस्फोट घ्यायचा आहे का, इथेच हे जाहीर कर. बरं, बाहेर जाऊन काही होणार नाही. तू फक्त बोलत राहतेस. तुझा प्रॉब्लेम हाच आहे की तू बोलून जाते... तुला कधी काय बोलावे तेच कळत नाही. हे ऐकून अंकिता म्हणते मी घटस्फोट कधी मागितला. यावर विकी म्हणतो की, तू एका टास्कमध्ये म्हणाली होतीस, तू बोललीस तर मी ईशाला विचारेन. हे ऐकून अंकिता म्हणते की, मी हे गंमतीत बोलले असावे. यावर विकी म्हणतो की, तू जे काही बोलतोस ते विनोद आहे आणि मी जे काही बोलतो ते गंभीर आहे. याआधीही अंकिता लोखंडेने अनेकदा विकी जैनपासून दूर राहण्याची चर्चा केली होती.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडे