छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम बिग बॉस ओटीटी (bigg boss ott) वेगवेगळ्या कारणांसाठी ओळखला जातो. यातलीच त्याची एक ओळख म्हणजे अभिनेता सलमान खान (salman khan) याचं सूत्रसंचालन. गेल्या कित्येक वर्षांपासून सलमान हा कार्यक्रम होस्ट करत आहे. त्यामुळे त्याच्या जागी दुसरा एखादा होस्ट असणं प्रेक्षक इमॅजीनच करु शकत नाहीत. यामध्येच आता या कार्यक्रमाविषयी एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यानुसार, सलमान खानला हा शो लवकरच सोडावा लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.
या शोमध्ये प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रंगणाऱ्या वीकेंड का वॉरमध्ये सलमान घरातील स्पर्धकांची शाळा घेतो. मात्र, मागील २ एपिसोडपासून तो या शोमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे आता नव्या चर्चेला उधाण आलं आहे. सलमान नसल्यामुळे पहिल्या दिवशी कृष्णा अभिषेकने हा शो होस्ट केला. तर, दुसऱ्या दिवशी भारती सिंहने त्याला साथ दिली.
'मी मराठी नायक असल्याने..'; 'मैंने प्यार किया'च्या सेटवर लक्ष्मीकांत यांना टाळायचा सलमान
नेमकं काय आहे प्रकरण?
दोन आठवड्यांपूर्वी या शोच्या सेटवरुन सलमानचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये तो सिगारेट ओढताना दिसत होता. विशेष म्हणजे मी धुम्रपान करत नाही असं म्हणणाऱ्या सलमानच्या हातात सिगारेट पाहिल्यावर नेटकऱ्यांनी सलमान आणि बिग बॉस ओटीटीला जबरदस्त ट्रोल केलं. इतकंच नाही तर सलमानने माफी मागवी अशी मागणीही नेटकऱ्यांकडून केली गेली. त्यामुळे सलमान माफी मागणार का? हा प्रश्न आहे. तसंच यंदाच्या पर्वामध्ये स्पर्धकांनी अश्लीलपणाचा कळस गाठला आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी या कार्यक्रमाला ट्रोल केलं आहे. त्यामुळे हे प्रकरण निवळल्यानंतरच सलमान पुन्हा शो होस्ट करेल असे म्हटलं जात आहे. परंतु, सलमानने हा शो सोडलाय की काही काळासाठी त्याने ब्रेक घेतलाय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.