Join us

निर्मात्यांनी या अटी मान्य केल्यानंतरच बोल्ड सीन्स देण्यास तयार झाली ही टीव्ही अभिनेत्री?जाणून घ्या काय होत्या खास अटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 6:32 AM

‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ मालिकेचे कलाकार आणि मालिकेची संपूर्ण टीम अलीकडेच आपल्या पहिल्या परदेशी स्थळावरील चित्रीकरणासाठी बँकॉकला गेले ...

‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ मालिकेचे कलाकार आणि मालिकेची संपूर्ण टीम अलीकडेच आपल्या पहिल्या परदेशी स्थळावरील चित्रीकरणासाठी बँकॉकला गेले होते.मालिकेच्या आगामी कथाभागात अनेक नवी वळणे पाहायला मिळणार आहेत.कारण मालिकेत मावशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सादिया सिद्दिकी कुटिल कारस्थान उघड करण्यासाठी उमा शंकर (अविनाश रेखी) आणि कनक (रिया शर्मा) हे तिच्यामागोमाग बँकॉकला गेले आहेत.परदेशातील चित्रीकरणाच्या वेळी मालिकेतील प्रमुख कलाकारांच्या वेशभूषेत बदल झाला होता.पण रसिकांना सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का  मावशीच्या व्यक्तिरेखेत झालेल्या आमूलाग्र बदलामुळे बसला आहे.सादिया सिद्दिकी टीव्हीवर प्रथमच स्विमसूटच्या वेशात पाहायला मिळाली.परंतु अशी धाडसी दृष्ये देण्यासाठी या प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत:वर काही मर्यादा घालून घेतल्या होत्या. सादिया सांगते,“साडी नेसल्यावर तुमचं अंग झाकलं जात असल्याने तुमचा बांधा कसा आहे,ते फारसं महत्त्वाचं ठरत नाही.पण जेव्हा स्विमसूट घालायचा म्हटलं की तुम्ही त्यात अगदी ग्लॅमरस दिसले पाहिजे.त्यामुळेच मला जेव्हा सांगण्यात आलं की मला या मालिकेत स्विमसूट घालावा लागणार, हे समजताच मी व्यायामाला सुरूवात केली.तसंच मी आहारातही बदल करून घेतला.योग्य डाएट घेत राहिले.पण मी तेव्हाच निर्मात्यांना हेही सांगितलं  होते की मी काही सनी लिओनी नाही,तेव्हा मी काही मर्यादा पाळूनच अशी दृष्यं देईन.”त्यानुसार निर्मांत्यांनीही तिच्या सगळ्या अटी मान्य करत तिला ही भूमिका साकारण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे तिने सांगितले.Also Read:सादिया सिद्दिकीचा स्विम सूटमधील फोटो तुम्ही पाहिला का?सादिया सिद्दिकी ही या मालिकेत कायम साडीत दिसून आली असून आगामी भागांमध्ये प्रथमच ती थेट स्विम सूटमध्ये दिसली होती.या दृश्यांसाठी तिने अतिशय शिस्तबद्ध डाएट राखून सुडौल फिगर दिसण्यासाठी व्यायाम केला. “जेव्हा तुम्ही साडी नेसता, तेव्हा फिगरबद्दल फारसे कळून येत नाही, पण स्विमसूटमध्ये चांगले दिसायला छान फिगरच हवी. जेव्हा मला सांगण्यात आले की मला स्विम सूट घालायचा आहे, तेव्हा लगेचच मी जिममध्ये जाऊन व्यायाम करायला सुरुवात केली. माझ्या डाएटमध्ये सुधारणा केली. अर्थात मी माझ्या निर्मात्यांना सांगितले की, मी काही सनी लिओनी नाही त्यामुळे मी काही एकदम छोटा स्विमिंग सूट घालू शकत नाही. तसेच एकदम फिट दिसू शकत नाही,” असे सादिया हसत सांगते.