Join us

'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्राची बहीण मुक्ता आहे मराठी सिनेसृष्टीतील या दिग्दर्शकची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 10:00 AM

मुक्ताने 2021मध्ये लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. प्राजक्ताचा पतीसुद्धा अभिनयक्षेत्रात मोठे नाव आहे.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला 'मन उडू उडू झालं' मालिकेतील मुक्ताबाबत सांगणार आहोत.

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडीबाबत सांगणार आहोत. ही जोडी आहे प्रसिद्ध  अभिनेत्री मुक्ता उर्फ प्राजक्ता आणि तिच्या पतीची.

प्राजक्ता परबने 2021मध्ये लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. प्राजक्ताचा पतीसुद्धा अभिनयक्षेत्रात मोठे नाव आहे. प्राजक्ता परब दिग्दर्शक आणि लेखक असलेल्या अंकुश मरोडेची पत्नी आहे.९ जानेवारी २०२१ रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले होते. इंडस्ट्रीत एक उत्कृष्ट दिगदर्शक म्हणून अंकुशनेही छाप पाडली आहे. 'ती परत आलीये' या मालिकेचे दिग्दर्शन अंकुश मरोडेच करत आहे.

मराठीसह हिंदीतही अंकुश प्रचंड प्रसिद्ध आहे. हिंदी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. 'सड्डा हक', 'लाल ईश्क', 'ऐसी दिवानगी देखी नहीं कहीं' या हिंदी मालिका केल्या आहेत. सात वर्षे हिंदी मालिकेत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत असताना 'एक घर मंतरलेलं' या मालिकेतून त्याने मराठी सृष्टीत पाऊल टाकलं होतं. 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड', 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचं २० ते २५ दिवसाच काम करण्याची संधीही अंकुशला मिळाली होती.

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी