Join us

बाहुलीसोबत खेळणाऱ्या या क्युट चिमुरडीला ओळखलंत का?, आज आहे सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 19:09 IST

फोटोत बाहुलीसोबत दिसणारी ही क्युट मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोत  हातात बाहुलीसोबत बसलेली ही क्युट मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून शिवानी बावकर आहे. शवानी या फोटोत बाहुली मांडीवर घेऊन खेळताना दिसतेय. फोटो शिवानी कॅमेऱ्याकडे बघून क्लोजअप स्माईल देताना दिसतेय. शिवानी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ते आपले फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सातत्याने शेअर करत असते. अलीकडेच ती सोनी मराठीवरील कुसूम मालिकेत दिसली होती. 

'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. या मालिकेत शिवानीने शितली ही भूमिका साकारुन तुफान लोकप्रियता मिळवली. अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे.

कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती.ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाडपणे आणि बिनधास्तपणे बोलू शकते.त्यामुळे शीतली साकारण्याआधी तिने एका आयटी कंपनीत जर्मन ट्रान्सलेटर म्हणून कामही केलं होतं. 

टॅग्स :शिवानी बावकरटिव्ही कलाकार