फोटोत दिसणारी ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज मराठी कलाविश्वावर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 04:39 PM2023-05-10T16:39:38+5:302023-05-10T16:55:03+5:30

अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत

Did you recognize this brothers and sisters jodi, today they are famous faces in marathi industry | फोटोत दिसणारी ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज मराठी कलाविश्वावर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू!

फोटोत दिसणारी ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज मराठी कलाविश्वावर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू!

googlenewsNext

अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात हे अभिनेता-अभिनेत्री एकमेकांचे सख्खे भाऊ बहिणी आहेत ते फारसं कुणाला ठाऊक नाहीत. यापैकीच एक जोडी आहे. मुरांबा मालिकेत अक्षयची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकर आणि त्याच्या बहिणीची. सोशल मीडियावर त्यांच्या काही वर्षांपूर्वीचा फोटो समोर आला आहे.

शशांकची बहिणीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. तिनेच शशांकसोबतचा काही वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. शशांकची बहिणी अभिनेत्री दीक्षा केतकरने हा फोटो शेअर केला आहे आणि त्यात शशांकला टॅग केलंय.  हा फोटो 2009 सालचा आहे. म्हणजेच हा फोटो तब्बल 13 वर्षांपूर्वीचा आहे. फोटोत दोघांनही ओळखणं कठीण जातेय.

शशांकची बहीण दीक्षा ही देखील अभिनेत्री आहे. 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेतून तिने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.दीक्षानं अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. दीक्षानं न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. तर शशांकने  पुण्यातील के.डी. वाय. पाटील कॉलेजमधून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. मुळात इंजिनिअर असेलल्या शशांकने ऑस्ट्रेलियातून एमईएम (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट) केले आहे. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर शशांकने पुण्याचा सुदर्शन रंगमंच जॉईन केला. तिथे सचिन कुंडलकर दिग्दर्शित पूर्णविराम हे नाटक मिळले. हे त्याचे पहिले नाटक.

 ‘कालाय तस्मै: नम:’ ही शशांकची पहिली मराठी मालिका. त्यानंतर सुवासिनी, स्वप्नांच्या पलीकडे, फिरुनी नवी जन्मेन या मालिकांमध्ये त्याने छोटेखानी भूमिका साकारल्या. रंग माझा वेगळा ही शशांकची मुख्य भूमिका असलेली पहिली मालिका होती. मात्र शशांकला खरी ओळख मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे. या मालिकेत शशांकने श्रीरंग नावाच्या उद्योजकाची भूमिका साकारली होती.

Web Title: Did you recognize this brothers and sisters jodi, today they are famous faces in marathi industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.