छोट्या पडद्यावरील 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, बबड्या, शुभ्रा, अनुराग या सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर हिने साकारली आहे.
अभिनेत्री उमा पेंढारकर हिचे पूर्ण नाव उमा ऋषिकेश पेंढारकर असे आहे. डोंबिवलीकर असलेल्या उमा पेंढारकर हिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण हे रामनारायण रुईया महाविद्यालयात पूर्ण झाले. तिने सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे. त्यामुळे ती काउंसिलिंगचे कामही मोठया जबाबदारीने करते.
तसेच उमाने ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरविले आहेत. अद्वैत दादरकारचे आई-वडील शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिने नाट्य संगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे पहिले-वहिले नाटक मिळाले.
उमाची ‘स्वामिनी’ ही पहिलीच मालिका होती.या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.