Join us

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांची लग्नपत्रिका तुम्ही पाहिली का? पाहा PHOTOS

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:27 IST

खुद्द कपिलनेच त्यांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. या पत्रिकेचे विशेष म्हणजे या पत्रिकेवर राजमहल आणि हत्ती यांची चित्रं आहेत. त्यासोबतच मिठाई, ड्राय फ्रू टस हे देखील ठेवलेले दिसत आहेत.

सिनेसृष्टीतील विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यात कॉमेडी किंग कपिल शर्माही लग्नबंधनात अडकणार आहे. खुद्द कपिलनेच त्यांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. या पत्रिकेचे विशेष म्हणजे या पत्रिकेवर राजमहल आणि हत्ती यांची चित्रं आहेत. त्यासोबतच मिठाई, ड्राय फ्रूटस हे देखील ठेवलेले दिसत आहेत. या लग्नपत्रिका प्रचंड आकर्षक दिसत आहेत. त्यांच्या लग्नाची ही पत्रिका  त्यांचे लग्न किती शानदार होणार आहे, हे स्पष्ट करत आहे.  तुमच्यासाठी खास या लग्नपत्रिका आम्ही शेअर करत आहोत.

 

गेल्या काही दिवसांपासून कपिलच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. मात्र यावर कपिलकडून कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. आता खुद्द कपिलनेच त्याची लग्न पत्रिका शेअर करत साऱ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. १२ डिसेंबरला कपिल गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार आहे. सध्या कपिलच्या लग्नाची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. लग्नानंतर १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

                                              

गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून सावरला असून छोट्या पडद्यावर परतण्यास सज्ज आहे. तुर्तास कपिलला त्याच्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार म्हटल्यावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.   

टॅग्स :कपिल शर्मा लग्न