स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' (Mulgi Jhali Ho) या मालिकेमधील माऊच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आता रंजक वळणावर येऊन थांबली आहे. अल्पावधीतच लोकप्रियता मिळालेल्या या मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा अगदी यशस्वीपणे पार पाडला आहे. या मालिकेत साजिरी म्हणजेच माऊची भूमिका अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर (Divya Pugaonkar)ने साकारली आहे. दिव्या पुगावकर ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचली आहे.
मुलगी झाली हो या मालिकेतील साजिरी या व्यक्तिरेखेस बोलता येत नाही, त्यामुळे आपल्या हातवाऱ्यांनी तिला आपले म्हणणे समजवावे लागते. दिव्याने साजिरीची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. या मालिकेमुळे तिचे फॅन फॉलोव्हिंग वाढले आहे. तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दिव्या पुगावकर रिलेशनशीपमध्ये असून तिच्या या बॉयफ्रेंडचे नाव आहे अक्षय घरत.
अक्षय घरत फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे रूपांंतर हळूहळू प्रेमात झाले. दिव्याच्या वाढदिवसादिवशी अक्षयने मालिकेच्या सेटवर जाऊन तिला सरप्राईज दिले होते.
दिव्या पुगावकर हिने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेआधी ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि ‘विठुमाऊली’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तिला पहिल्यांदाच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आहे.