Join us  

राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील राधाचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 10:38 AM

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेला आता चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत आता सत्यनारायणाच्या पूजेला राधा ...

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेला आता चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत आता सत्यनारायणाच्या पूजेला राधा आणि प्रेम बसणार आहे. ज्यासाठी राधा प्रेमला सोहळ कसं नेसतात हे शिकवणार आहे. प्रेमला या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत पण तरीही तो हे करण्यास तयार होणार आहे. या सगळ्या गोंधळानंतर पूजा निर्विघ्नपणे पार पडणार आहेत. पण पूजेनंतर प्रेम आणि दीपिका एका पबमध्ये जाणार आहेत. प्रेम दीपिकासोबत पबमध्ये जातो या गोष्टीवर राधा काहीच बोलत नाही हे प्रेमच्या आईला म्हणजेच माधुरीला कळल्यावर तिला ही गोष्ट अजिबात पटणार नाहीये. माधुरीला ही गोष्ट न पटल्याने ती राधाला त्या पबमध्ये पाठवणार आहे. पण राधाचे पबमध्ये अचानक येणे हे दीपिका आणि प्रेम यांना अजिबात आवडणार नाहीये आणि त्यात प्रेमच्या मनात राधाबद्दल राग, तिरस्कार निर्माण होण्यासाठी दीपिका राधाच्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स करणार आहे. राधा अनभिज्ञ असल्याकारणाने ती ते ड्रिंक पिणार देखील आहे. ड्रिंक घेतल्यानंतर राधाच्या वागण्यात झालेला बदल बघून तिच्यावर प्रेम खूप चिडणार आहे. पण या सगळ्यानंतर हा सगळा प्लान दीपिकाचा आहे हे माधुरीला कळणार आहे. आता यातून माधुरी काय करणार? प्रेमला दीपिकापासून कसे दूर करणार? प्रेम राधाला माफ करणार का? प्रेमची समजूत काढण्यासाठी राधा आता काय करणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.राधाचा पबमधील लूक हा खूपच वेगळा असणार आहे. तिच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या भागामध्ये राधाने खूप छान ड्रेस घातलेला आपल्याला दिसणार आहे. या लुकमध्ये ती खूप सुंदर आणि गोड दिसत आहे. दीपिकाने दिलेले ड्रिंक घेतल्यामुळे राधाला भान उरणार नाहीये आणि त्यामुळे ती काय बोलणार याची तिला शुद्ध राहाणार नाहीये. त्यामुळे प्रेम तिच्यावर खूप वैतागणार आहे. राधा प्रेमला तुम्ही “चावी दिलेल्या खेळण्यातले रोबो” आहात असे देखील म्हणणार आहे. मजेत का होईना राधा प्रेमला खरं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण या सगळ्या घटनांमुळे प्रेम आता राधाशी बोलणे सोडणार आहे. यातून आता राधा प्रेमची समजूत कशी काढणार? माधुरी राधाची या सगळ्यात काय मदत करणार? राधा आणि प्रेम मध्ये दुरावा टिकून रहावा यासाठी दीपिका काय करणार? हे बघणे रंजक असणार आहे.Also Read : राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील कलाकारांची ऑफस्क्रीन धमाल मस्ती