Join us

'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेच्या पत्नी आणि लेकीला पाहिलंत का?, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 4:52 PM

Chala Hawa Yeu Dya Fame Sagar Karande: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेच्या फॅमिलीचा फोटो नुकताच समोर आला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शोचा भारतासह जगभरात खूप मोठा चाहता वर्ग आहे. या शोमधील कलाकारांनी आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. या शोमधून निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugde), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), सागर कारंडे (Sagar Karande) हे विनोदवीर घराघरात पोहचले. या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सागरच्या फॅमिलीचा फोटो नुकताच समोर आला आहे.

अभिनेता सागर कारंडेने फेसबुक अकाउंटवर त्याच्या पत्नी आणि लेकीसोबतचा फोटो शेअर केला आहे. सध्या तो फॅमिलीसोबत अलिबागमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतो आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत तो पत्नी आणि मुलीसोबत बीचवर दिसत आहे. त्याच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

सागर कारंडेने कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमधून डिग्री घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागर एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. पण अभिनयाची ओढ त्याला कायम होती. नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला. अखेर सागरनं नोकरी सोडून पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरण्याचा निर्णय घेतला.

सागरचे कॉमेडीचं टायमिंग इतके अचूक आहे की प्रेक्षक त्याच्या विनोदांना दाद दिल्यावाचून राहत नाहीत. इंटरनेट, ई-मेल, मोबाइलच्या काळात पोस्टमन ही संकल्पना इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती. मात्र ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सागरने साकारलेला पोस्टमन पाहून प्रेक्षक नॉस्टॅल्जिक झाले. सागरने नाटक आणि चित्रपटातही काम केले आहे. आता लवकरच तो भिरकिट या चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्या