सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेता मंदार जाधवच्या कुटुंबाविषयी सांगणार आहोत.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जयदीप अर्थात अभिनेता मंदार जाधव सध्या सगळ्यांचाच फेव्हरिट झाला आहे. मंदार अनेकवेळा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
मंदारच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत. मंदारच्या पत्नीच नाव मितिका शर्मा जाधव असे आहे. ती स्वत: देखील एक अभिनेत्री आहे.. देवो के देव महादेव या हिंदी मालिकेत मितिकाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. मंदारने देखील हिंदी मालिकेत काम केले आहे. ही मालिका म्हणजे अलादीन. २०१६ साली मंदार आणि मितिकाने लग्न केले. त्यांना दोन मुले असून त्याचे नाव रिदान आणि रेहान असे आहे.मितीका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.