Join us  

'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेच्या पत्नीला पाहिलंत का?, अभिनेत्यानं लिहिली स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 12:02 PM

Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके छोट्या पडद्यावरील चला येऊ द्या कार्यक्रमातून घराघरात पोहचला. सध्या तो सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता कुशल बद्रिके छोट्या पडद्यावरील चला येऊ द्या कार्यक्रमातून लोकप्रिय झाला. आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने त्याने लोकांच्या मनात घर केले. त्याच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही खूप वाढ झाली आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. दरम्यान आता अभिनेत्याने आपल्या पत्नीसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे, जी खूप चर्चेत आली आहे.

अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पत्नीचा फोटो शेअर करत लिहिले की, यार सुनयना,लग्नानंतर तू नोकरी करायचा निर्णय घेतलास आणि मी “अभिनय” क्षेत्रात struggle करायला मोकळा झालो. माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या “तू” एक हाती सांभाळल्यास. घराचे हप्ते, संसाराचा राडा, गंधारचं बालपण सगळं सगळं तू बघितलस. मी कुठेच नव्हतो ह्या सगळ्यात!आणि त्यानंतर कधीतरी “तू” स्वतःसाठी एक स्वप्न पाहिलंस “कथ्थक शिकायचं, आणि perform करायचं”.

तो पुढे म्हणाला की, आज तुला Mughal-E-Azam च्या शो मध्ये perform करताना पाहिलं आणि काय भारी वाटलं यार मला. ते रात्री अपरात्री तू “क्रांधा तिकधा तुन्ना…, तिकीड तिकीड धुम….” वगैरे बडबड करायचीच बघ, सारखं ते बोटांवर काहीतरी “एक दोन, एक दोन तीन…., एक दोन तीन चार…” असं काहीतरी बडबड करत राहायचीस रात्ररात्रभर ते आठवलं. (Sorry मला नेमक असं त्यातलं काही येत नाही पण..) किती मस्त नाचतेस ग “तू“ आणि किती मोठ्या जागी परफॉर्म करतेस यार. खरंच तुझा अभिमान वाटतो मला. “तुझ्या नावापुढे, माझं एक नाव जन्म मृत्यू पल्याड, प्रेम नावाचं गाव” आणि हो, “Mughal-E-Azam” एक जिवंत सिनेमा, एक दैदिप्यमान अनुभव. @priyanka.barve तुझ्या विषयी सविस्तर लिहीनच पण तू कमाल आहेस अनारकली म्हणून तू सलीमचच काय आम्हा सगळ्या प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकलीस . तुला खूप प्रेम.

अभिनेता कुशल बद्रिके बऱ्याचदा बायकोसोबतचे फोटो आणि मजेशीर व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते.

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या