‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumama Chya Navan Chang Bhala) या लोकप्रिय मराठी मालिकेतील ‘बाळूमामा’ अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale ) १४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकला. सुमीतने मोनिका महाजनसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान आता नवीन वर्षाच्या सुरूवातील सुमीत पुसावळेने पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे.
सुमीत व मोनिका यांनी सांगोला येथे पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान आता नवीन वर्षांच्या सुरुवातीला सुमीत पुसावळेने पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सुमित पुसावळे हा मूळचा दिघंजी गावचा आहे. शालेय शिक्षणानंतर तो पुण्यात आला. इथे त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आणि काही काळ याच क्षेत्रात नोकरी केली. त्याला स्वत:चे रेस्टॉरंट उभारायचे होते. पण लहानपणापासूनच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे त्याच्यात कलेची आवड निर्माण झाली आहे.