'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या आयुष्यातील परमसुंदरीला पाहिलंत का?, त्याने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 07:00 AM2021-08-27T07:00:00+5:302021-08-27T07:00:00+5:30

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत ओमची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकरला तर या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.

Did you see Yeu Kashi Tashi Mi Nandayla fame Om's real life Param Sundari? He shared the photo | 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या आयुष्यातील परमसुंदरीला पाहिलंत का?, त्याने शेअर केला फोटो

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या आयुष्यातील परमसुंदरीला पाहिलंत का?, त्याने शेअर केला फोटो

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. या मालिकेत ओमची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकरला तर या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली असून त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची त्याच्या फॅन्सची इच्छा असते. श्रेया डाफळापूरकरसोबत शाल्व रिलेशनशीपमध्ये आहे आणि बऱ्याचदा तो सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत असतो.

शाल्व किंजवडेकरने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर त्याची गर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकरसोबतचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे आणि या फोटोला त्याने हाय मेरी परम सुंदरी असे कॅप्शन दिले आहे.

शाल्व आणि श्रेयाच्या या रोमँटिक फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटीदेखील कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.  


शाल्व आणि श्रेया  हे दोघंही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल व्यक्त होताना दिसतात. शाल्व आणि श्रेयाच्या रिलेशनशीपला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रेमसंबंध आणि खासगी आयुष्याबद्दल शाल्व उघडपणे बोलत नाही. मात्र श्रेया सोबतचे सोशल मीडियावरील त्याचे रोमँटिक फोटोज त्याच्या नात्याबद्दल बरेच काही सांगून जातात. श्रेया डाफळापूरकर ही स्टायलिस्ट असून तिचे स्वतःच फॅशन लेबलसुद्धा आहे.


शाल्व किंजवडेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याने हंटर, मेड इन हेवन आणि वन्स अ इअर या चित्रपटात काम केले आहे.

Web Title: Did you see Yeu Kashi Tashi Mi Nandayla fame Om's real life Param Sundari? He shared the photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.