Join us

"खरंच मला तुझा अभिमान वाटतो.." अभिनेता कुशल बद्रीकेनं पत्नीसाठी लिहिली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 4:24 PM

'चला हवा येऊ द्या'मधून घराघरात पोहचलेला अभिनेता कुशल बद्रीकेचं. नुकतीच कुशलने आपल्या पत्नीसाठी पोस्ट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

'चला हवा येऊ द्या'मधून घराघरात पोहचलेला अभिनेता कुशल बद्रीकेचं... कधी मुलांसोबत स्वत अभ्यास करताना...तर कधी फॅमिली पिकनीक...कुशल शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढतोच आणि आनंदाने त्यांच्यासोबत कॉलिटी टाईम स्पेण्ड करतो...कुशलचं लव्ह मॅरेज असून त्याने 2009 मध्ये सुनैनाशीच लग्नगाठ बांधली. आज या दोघांना दोन गोड मुलं आहेत...प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते अगदी तसंच कुशलच्या मागेदेखील सुन्नैना कायम उभी राहिली. पण या सगळ्यात ती नं आपलं करिअर देखील सांभाळलं. सुन्नैना कथ्थक डान्सर आहे. नुकतीच सुन्नैना साठी कुशलने केलेली पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय...कुशलने लिहिले आहे की,खरंतर तू दिल्लीला जाऊन “कथ्थक केंद्रात” शिकावस, हे माझं स्वप्न होतं. पण घरच्या जबाबदारीत ते मागे पडत राहीलं. ते राहीलच!पण बघ ना आज तू तिथे परफॉर्म करतेस . खरच मला तुझा अभिमान वाटतो...आयुष्यातली सगळीच स्वप्न आकार घेत नाहीत, पण त्यातली काही साकार होतात हे खर.ही संधी तुला देणार्‍यांचे मनःपूर्वक आभार.आणि एकच गोष्ट सांगेन,जा… सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी…

सुन्नैनाला दिल्लीतील कथ्थक केद्रांत शिकायला जायची खूप इच्छा होती पण ती अपूर्ण राहिली. पण आज ती त्याच ठिकाणी आपला परफॉर्मन्स सादर करणार आहे. आज कुशल यशाच्या शिखरावर आहे. कारण कठीण काळातही सुन्नैना त्याच्यामागे ठामपणे उभी राहिली. . खरच हे दोघे एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर आहेत. कुशल हा सोशल मीडियावर बरेच एक्टिव्ह असतो. तो सुन्नैना सोबतचे अनेक खास क्षण हे कायम चाहत्यांसोबत शेअर करत असतो. 

 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार