Join us

‘निम्की मुखिया’मालिकेती ही अभिनेत्री आजारी असूनही करतेय चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 7:26 AM

‘निम्की मुखिया’ या मालिकेत  इमरती देवीची भूमिका साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी हे अभिनय क्षेत्रातलं मोठं नाव आणि तितकचं ...

‘निम्की मुखिया’ या मालिकेत  इमरती देवीची भूमिका साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी हे अभिनय क्षेत्रातलं मोठं नाव आणि तितकचं रसिकांच्याही आवडत्या अभिनेत्री आहेत. वयाच्या  65व्या वर्षीही त्याचा उत्साह तरूण पिढीलाही लाजवेल असाच असतो. इतकेच नाहीतर कलाकरांना कोणतीही परिस्थिती असो  त्यांना त्या परिस्थीत मिळालेली जबाबदी पार पाडायची असते. त्यामुळे कधी निंदा कधी वंदा मनोरंजन करणे हाच आमचा धंदा म्हणत अभिनेत्री आणि अभिनेते मात्र आपल्या रसिकांचे शेवटपर्यंत मनोरंजन करत असतात. आजपर्यंत अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत ज्यांनी आपले सर्वस्व या क्षेत्रासाठी पणाला लावले आहेत.रसिकांचे मनोरंजन करण्याचे हाती घेतलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सध्या कोणत्याही गोष्टीची परवाह न करता आपले काम नित्यनियामने करतायेत. रिटा भादुरी यांना  मूत्रपिंडाच्या व्याधीने ग्रासले असून त्यांना  एक दिवसाआड डायलिसिसचा उपचार घ्यावा लागत आहे. शारीरिक व्याधीचा त्रास असूनही त्या आपले मनं सतत त्या गोष्टीचा विचार करत राहण्यापेत्रआ स्वतःला कुठेतरी व्यस्त करून ठेवावे यासाठी त्या निम्की मुखिया मालिकेत रसिकांचे मनोरंजन करताना दिसतायेत.मालिकेच्या सेटवर त्यांची खूप काळजीही घेतली जाते. चित्रीकरणानंतरच्या मोकळ्या वेळेत त्या आराम करतात.इतकेच नव्हे, तर ‘निम्की मुखिया’ या मालिकेची सर्व टीम  त्यांच्या  उपचाराच्या दिवसांनुसार चित्रीकरणाच्या तारखा उपलब्ध करून दिल्या जातात.तसेच  टीमने आपल्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकात ऐनवेळी कोणताही बदल करण्याची तयारी ठेवली असून रिटाजींच्या तब्येतीनुसारच चित्रीकरणाचे वेळापत्रक निश्चित केले जाते.यासंदर्भात रिटा भादुरी यांनी सांगितले, “प्रत्येकजण कधी ना कधी आजारी पडतोच आणि त्यातून बाहेरही येतो. फक्त तुमच्या अखेरच्या आजारातून कोणी वाचत नाही. मला अभिनय करीत राहायला आणि कामात सतत व्यग्र राहायला आवडतं. मला सर्व प्रकारे मदत आणि सहकार्य करणारे सहकलाकार मासलिकेची संपूर्ण टीम माझ्यासाठी खूप मेहनत घेताता. आज ही सगळी माणसं माझ्या कुटुंबाप्रमाणेच माझी काळजी घेतात. या पेक्षा मोठं भाग्य ते काय असू शकतं.असे सहकारी असले, की तुम्हालाही उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळते.”या मालिकेतील इतर कलाकारही खूप मेहनत घेताना दिसतात. इंद्रनील सेनगुप्ता सध्या ‘निम्की मुखिया’ या मालिकेत अभिमन्यू राय एका अधिका-याची भूमिका साकारताना दिसत आहे.सध्या तो  एका बंगाली चित्रपटाचही शूटिंगमध्ये बिझी आहे.त्यामुळे सध्या तो मालिका आणि चित्रपट या दोन्ही गोष्टींचे शूटिंग करत असल्यामुळे ‘निम्की मुखिया’च्या चित्रीकरणासाठी त्याला मुंबईत राहावे लागते आणि त्याच्या बंगाली चित्रपटांतील भूमिकांसाठी त्याला कोलकात्यात राहावे लागते.या मालिकेला अल्पावधीत रसिकांची चांगलीच पसंती मिळत आहे.