Join us

'दिल दोस्ती दुनियादारी'फेम अ‍ॅना आठवतीये का? 'या' मालिकेतून करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 15:35 IST

Pooja thombare: पूजा 'अमर फोटो स्टुडिओ' या गाजलेल्या नाटकात झळकली. मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी' (dil dosti duniyadari). मैत्रीवर आधारित असलेली ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतून अनेक नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे पूजा ठोंबरे (pooja thmobre). या मालिकेनंतर पूजाचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र, आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यासाठी ती सज्ज झाली आहे.

दिल दोस्ती दुनियादारीमध्ये पूजाने अ‍ॅना ही भूमिका साकारली होती. थोडीशी खट्याळ पण तितकीच प्रेमळ असलेली अ‍ॅना  प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या मालिकेनंतर पूजा 'अमर फोटो स्टुडिओ' या गाजलेल्या नाटकात झळकली. मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, आता एका नव्याकोऱ्या भूमिकेसह प्रेक्षकांना भेटण्यासाठी पूजा सज्ज झाली आहे.

झी मराठीवर लवकरच चंद्रविलास ही हॉरर जॉनर असलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत वैभव मांगले, सागर देशमुख आणि आभा बोडस हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. याच मालिकेत पूजा ठोंबरेची एन्ट्री झाली असून ती देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन