'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका पडद्यावर जितकी खळखळून हसवते तितकीच भांडणं त्यांची पडद्यामागे सुरु आहेत. मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर आतापर्यंत मालिकेतील अनेक कलाकारांनी आरोप केले आहेत आणि हा शो सोडला आहे. तारक मेहता ही मुख्य भूमिका साकारणारे शैलेष लोढा ते जेनिफिर मेस्त्री यांनी असित मोदींवर गंभीर आरोप केले. आता नुकतंच अशी माहिती समोर येत आहे की जेठालाल म्हणजे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांचंही असित मोदींसोबत जोरदार भांडणं झालं आहे. हे भांडण अगदी मारामारीपर्यंत गेल्याचीही चर्चा आहे.
जेठालाल म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधलं मेन कॅरेक्टर आहे. त्यांच्याशिवाय मालिकेत मजाच नाही. हेच पात्र साकारणारे दिलीप जोशी घरोघरी प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांचाही निर्माते असित मोदींशी जोरदार वाद झाला. तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्टमध्ये त्यांच्यात सुट्ट्यांवरुन भांडण झालं. रिपोर्टनुसार, मालिकेतील गोली म्हणजेच कुश शाहचा सेटवर शेवटचा दिवस होता. दिलीप जोशींना सुट्ट्या हव्या होत्या. म्हणून ते असित मोदींशी बोलावं यासाठी त्यांची वाट पाहत होते. मात्र असित मोदी सगळ कुशला भेटायला गेले आणि त्यांनी दिलीपजींनी बघितलंही नाही. यामुळे दिलीप जोशी नाराज झाले. नंतर त्यांच्यात मोठं झालं, त्यांनी असित मोदींची कॉलर पकडली इतका वाद टोकाला गेला. दिलीप जोशींनी मालिका सोडण्याची धमकी दिली. तेव्हा असित मोदींनी त्यांना शांत केले. यानंतर दोघांनी एक सुवर्णमध्य काढून भांडण मिटवल्याची चर्चा आहे."
याबद्दल अद्याप दिलीप जोशी किंवा असित मोदींकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा अशाच सर्व कारणांमुळे चर्चेत आहे. १४ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र यातील बऱ्याच जणांनी आज मालिका सोडली आहे.