Join us

Dipika Kakar : ज्याचं करावं भलं, तो म्हणतो...; ज्याने वाचवलं, त्याच्यावरच तापली दीपिका कक्कर, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 1:26 PM

Dipika Kakar Video : होय, अलीकडे एका इव्हेंटमध्ये दीपिकाने असं काही केलं की, तिचं वागणं बघून अनेकांनी तिला ट्रोल केलं.

Dipika Kakar Video : भलाई का तो जमाना ही नहीं रहा, अशी  एक हिंदी म्हण प्रचलित आहे. टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्करचं (Dipika Kakar) वागणं पाहून अनेकांना हीच म्हण आठवतेय. होय, अलीकडे एका इव्हेंटमध्ये दीपिकाने असं काही केलं की, तिचं वागणं बघून अनेकांनी तिला ट्रोल केलं.

तर आता नेमकी भानगड काय तर, दीपिका नुकतीच एका कार्यक्रमात पोहोचली. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये ती या इव्हेंटमध्ये दिसली. कार्यक्रम संपला आणि दीपिका बाहेर पडत असतानाच हाय हिल्समुळे अचानक तिचा तोल गेला आणि ती धडपडली. नेमक्या याचक्षणी एका चाहत्याने तिला पकडलं आणि दीपिका पडता पडता वाचली. पण हे काय? त्या चाहत्याचे आभार मानण्याऐवजी दीपिका त्याच्यावरच चिडताना दिसली. डोन्ट टच मी म्हणत, तिने मदत करणाºयालाच तिने सुनावलं. दीपिका चिडलेली बघून तो चाहता बिचारा मुकाट बाजूला झाला.

सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि चाहते दीपिकाला ट्रोल करत आहेत. व्लॉगमध्ये इतकी चांगलं बनण्याचा प्रयत्न करते आणि रिअल लाईफमध्ये मदत करणाऱ्यालाच डोळे दाखवतेस, असं एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं. वाह, काय अ‍ॅटिट्यूड आहे मॅडमचा, असं म्हणत एकाने तिला ट्रोल केलं. हाच हिचा खरा चेहरा आहे, अशा शब्दांत अन्य एका युजरने तिला सुनावलं.  ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं, अशी कमेंट एकाने केली.

दीपिकाने 2011 मध्ये ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम केलं होतं. तिची ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत काम करत असताना तिचं रौनक सॅमसनशी लग्न झालं होतं. मात्र रौनक प्रचंड पझेसिव्ह असल्यानं  दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दीपिका अभिनेता शोएब इब्राहिमच्या प्रेमात पडली. 2018 मध्ये तिने शोएबशी लग्न केलं.

टॅग्स :दीपिका कक्करटेलिव्हिजनटिव्ही कलाकार