Join us

VIDEO : कसं शूट होतं पावसातलं रोमॅन्टिक सॉन्ग? व्हिडीओ पाहून कळेल फिल्मी रोमान्सचा झोलझाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 3:23 PM

Barsaat Ka Mausam Making Video : हे पावसातलं रोमॅन्टिक गाणं शूट करणं वाटतं तितकं सोप्प प्रकरण नाही. विश्वास बसत नसेल तर याचा मेकिंग व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा.

गुगलवर किंवा युट्यूबवर ‘रेन सॉन्ग’ असं सर्च केलं तर पावसाचा फिल वाढवणाऱ्या  ढीगभर बॉलिवूड गाण्यांची यादी येते. पाऊस आणि सिनेमाचं जुनं नातं आहे.  आताश: टीव्ही मालिका आणि व्हिडीओ अल्बमध्येही पावसात शूट केलेली रोमॅन्टिक गाणी दिसू लागली आहेत. आभाळातून पाऊस कोसळतोय आणि हिरो-हिरोईन त्या पावसात रोमॅन्टिक होऊन गाण्यावर नाचताहेत, अशी अनेक गाणी तुम्ही पाहिली असतील. सध्या शोएब इब्राहिम ( Shoaib Ibrahim ) आणि दीपिका कक्कड (Dipika Kakar) या दोघांचं ‘बरसात का मौसम’  (Barsaat Ka Mausam) हे असंच एक रोमॅन्टिक रेन सॉन्ग रिलीज झालं आहे.  टीव्हीवरच्या मोस्ट रोमॅन्टिक आणि लव्हिंग कपलचं हे पावसातलं गाणं सध्या चांगलंच धुमाकूळ घालतंय. पण हे पावसातलं रोमॅन्टिक गाणं शूट करणं वाटतं तितकं सोप्प प्रकरण नाही. विश्वास बसत नसेल तर याचा मेकिंग व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा.

शोएबने त्याच्या युट्यूब चॅनलवर ‘बरसात का मौसम’चा मेकिंग व्हिडीओ शेअर केला आहे. पावसात गाणं कसं शूट होतं, हे यात तुम्ही पाहू शकता. नकली पाऊस असली दाखवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. पंख्याद्वारे वादळ वाºयाचा इफेक्ट आणला जातो. लायटिंगवरही बारीक लक्ष ठेवावं लागतं.  

पावसात रोमॅन्टिक सॉन्ग शूट करणं कलाकारांसाठीही सोप्प नसतं. एका एका शॉटसाठी त्यांना वारंवार भिजावं लागतं. मेकिंग व्हिडीओमध्ये शोएब व दीपिका काही सीन्ससाठी रिटेक देत आहेत. पाण्यात भिजल्याने अंगात कापरं भरलं आहे. पण काम तर करावं लागणार...स्क्रिनवर पावसातला रोमान्स पाहताना मज्जा येते. पण यामागे अनेक लोकांची मेहनत असते. शोएब व दीपिकाच्या गाण्यामागेही असेच अनेकांचे कष्ट आहेत.

टॅग्स :दीपिका कक्करटेलिव्हिजनबॉलिवूड