Join us

Dipika Kakar Pregnant: 'ससुराल सिमर का' फेम दीपिका होणार आई, लग्नाच्या 5 वर्षांनंतर शेअर केली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 2:59 PM

Dipika Kakar Pregnant: दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे. दोघांच्याही लग्नाला 5 वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे.

Dipika Kakar Pregnant:  दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे. दोघांच्याही लग्नाला 5 वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे. होय, काही क्षणांपूर्वी दीपिका व शोएब यांनी आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. दीपिकाने शोएबसोबतचा एक पाठमोरा फोटो शेअर करत, आईबाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. फोटोत दोघंही बसलेले असून त्यांनी डोक्यावर मॉम आणि डॅड असं लिहिलेली कॅप घातली आहे.

कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि थोडीशा घाबरलेल्या मनाने ही बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. आमच्या आयुष्यातील हा एक सुंदर टप्पा आहे. होय, आम्ही आमच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहोत!! लवकरच आम्ही पालक होणार आहोत, असं दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. दीपिकाच्या प्रेग्नंसीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र त्यावेळी दिपिकाने या सर्व अफवा आहेत असं सांगितलं होत. मात्र आता तिने स्वत:च ही बातमी सांगितल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.  

लग्नाआधी दीपिकाने शोएबसाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. ससुराल सिमर का या मालिकेतून दीपिकाने केवळ प्रसिद्धी मिळवली नाही तर सहकलाकार शोएब इब्राहिममध्ये तिच्या आयुष्यातील प्रेम देखील सापडले.  शोएबने हा शो सोडल्यानंतर त्यांची मैत्री प्रेमात फुलली.   22 फेब्रुवारी 2018 रोजी शोएबच्या पूर्वीच्या मूळ गावी मौदाहा शहरात दोघांचा निकाह झाला होता. दीपिकाने 2011 मध्ये पायलट रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. पण  2015 मध्ये ते दोघे वेगळे झाले. दीपिकाचं शोएबसोबतचं हे दुसरे लग्न आहे. शोएब आणि त्याच्या कुटुंबाने तिला मनापासून स्वीकारले आहे.

टॅग्स :दीपिका कक्करटेलिव्हिजनटिव्ही कलाकार