Join us

"मी तुला काम देईन पण तू माझ्यासोबत..."; दिग्दर्शकाने केली विचित्र मागणी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:18 IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काऊचचा विचित्र अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे

मनोरंजन विश्वात काम करताना अनेकदा अभिनेत्रींना कास्टिंग काऊचसारख्या प्रकारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अभिनेत्रींना खूपदा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने कास्टिंग काऊच अनुभवाचा असाच धक्कादायक अनुभव सर्वांसोबत शेअर केला. इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी या अभिनेत्रीला एका दिग्दर्शकाने रात्री ३ वाजता विचित्र मागणी केली होती. ही अभिनेत्री कशिका कपूर. (kashika kapoor)  काय घडलं होतं नेमकं?

कशिकाला आला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

कशिका कपूरने २०२४ साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. परंतु पहिला प्रोजेक्ट मिळण्याआधी कशिकाला खूप स्ट्रगल करावा लागला होता. याशिवाय कास्टिंग काऊच प्रकाराची सुद्धा ती शिकार झाली होती. कशिकाने एका मुलाखतीत सांगितलं की, "मुंबईत येऊन मी १५० ऑडिशन्स दिल्या. अनेकदा मी फेल झाली पण हार नाही मानली. एक वेळ अशीही होती की, रात्री ३ वाजता एका दिग्दर्शकाने मला फोन केला. तो म्हणाला की, मी काम देईल पण तुला माझी शय्यासोबत करावी लागेल. मी अशा विचित्र गोष्टींना लगेच नकार द्यायचे. कारण जर १० वर्षांनी वळून मी स्वतःकडे पाहिलं तर माझ्या मनात कोणत्याही प्रकारची अपराधीभावना असता कामा नये."

"जर मला स्वतःला यशस्वी करायची असेल तर स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मी यशाच्या मार्गावर जाईन. मेहनतीच्या जोरावरच मी आजवर इथे पोहोचले आहे.  पुढेही यशस्वी होईन. अनेकदा कास्टिंग दिग्दर्शकांनी कॉल करुन मला विचित्र ऑफर्स दिल्या. असे कॉल आल्यावर लोक रात्री झोपत नाहीत का, असा विचार माझ्या मनात यायचा. यांना लाज नाही वाटत का?"

कशिकाच्या आजवरच्या करिअरमध्ये तिच्या आईचा तिला खूप सपोर्ट आहे. "कधीही हार मानायची नाही", ही शिकवण तिला तिच्या आईकडूनच मिळाली आहे. कशिकाने 'आयुषमती गीता मॅट्रिक पास' या सिनेमातून पदार्पण केलं. याशिवाय कशिकाने अनेक म्यूझिक व्हिडीओमध्येही काम केलंय. कशिकाचे सोशल मीडियावर १८ मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूडकास्टिंग काऊच