Join us

'सा रे ग म प'च्या मंचावर निष्ठा शर्मानं गायलं 'हँस के मिलना..', विधू विनोद चोप्रा यांनी केला कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 5:25 PM

निष्ठा शर्माने गायलेले ‘हँस के मिलना’ या पहिल्या स्वतंत्र गाण्यास नामवंत संगीतकार अमजद नदीम यांनी संगीत दिले आहे. या मंचावर तिला हे गाणे गाण्यापूर्वी स्वत: विधू विनोद चोप्रा यांनीच क्लॅप दिला. तिच्या या सुरेल गाण्यावर परीक्षक आणि विशेष अतिथी फारच खुश झाले.

मागील वर्षीच्या सीझनच्या उदंड यशानंतर झी टीव्हीवरील सा रे ग म प या गायनविषयक रिएलिटी कार्यक्रमाचे दणक्यात पुनरागमन झाले असून त्यात हिमेश रेशमिया, नीती मोहन आणि अनू मलिक हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करणार आहे. येत्या वीकेण्डचा भाग ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे कारण बारावी फेल या चित्रपटातील प्रमुख कलाकार विक्रांत मेसी आणि मेधा शंकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा व संगीत दिग्दर्शक शंतनू मोईत्रा यांच्यासह या विशेष भागात सहभागी होणार आहेत.  त्याशिवाय येत्या रविवारी, २२ ऑक्टोबर रोजीच्या भागात प्रेक्षकांना एक स्पर्धक निष्ठा शर्मा हिचे पहिले सिंगल गाणे ऐकायला मिळेल.

निष्ठा शर्माने गायलेले हँस के मिलना या पहिल्या सिंगल गाण्यास नामवंत संगीतकार अमजद नदीम यांनी संगीत दिले आहे. या मंचावर तिला हे गाणे गाण्यापूर्वी स्वत: विधू विनोद चोप्रा यांनीच क्लॅप दिला. तिच्या या सुरेल गाण्यावर परीक्षक आणि विशेष अतिथी फारच खुश झाले. तिचे हे गाणे ऐकल्यानंतर विधू विनोद चोप्रा म्हणाले, निष्ठा, ज्या प्रकारे तू हे गाणं गायलीस, ते अप्रतिम होते. मी त्याचा पुरेपूर आनंद घेतला. किंबहुना आजच्या या काळात इतक्या तरल आणि सुरेल सुरावटी ऐकायला मिळणं हे दुर्मिळ झालं आहे. उत्कृष्ट कामगिरी!

तर नीती मोहन म्हणाली, आजची तुझी ही कामगिरी आजवरची सर्वोत्कृष्ट होती. हे इतकं सुरेल आणि गोड गाणं जणू खास तुझ्यासाठीच बनलं आहे. तुझ्या पहिल्या स्वतंत्र गाण्याबद्दल तुझं अभिनंदन! हे गाणं सर्वांना आवडेल आणि सर्वजण ते गातील, अशी मी आशा करते!  निष्ठाच्या या गाण्याने सर्वांची मने जिंकली असली, तरी यापुढे स्वतंत्र गाणे गाण्याचा मान कोणत्या स पर्धकाला मिळेल, ते पाहणे प्रेक्षकांसाठी निश्चितच रंजक ठरेल. ‘सा रे ग म प’चा हा विशेष भाग शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर पाहायला मिळेल.