गुलाम ही मालिका स्वीकारण्यासाठी इंद्रनेल सेनने केली बरखा बिष्टसोबत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2016 11:44 AM
इंद्रनेल सेनगुप्ता आणि बरखा बिष्ट हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची केमिस्ट्री तर खूपच चांगली ...
इंद्रनेल सेनगुप्ता आणि बरखा बिष्ट हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची केमिस्ट्री तर खूपच चांगली आहे. ते दोघेही आपापल्या कामात व्यग्र असले तरी नेहमीच एकमेकांसाठी वेळ काढतात. या दोघांची ओळख एक राधा एक श्याम या मालिकेच्यावेळी झाली. ही मालिका दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला केली होती. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून ते दोघे एकत्र असल्याने त्या दोघांना एकमेकांच्या कामाची चांगलीच जाण आहे. ते दोघे आजही छोट्या पडद्यावर काम करत आहेत. त्यामुले कोणतेही काम स्वीकारताना ते एकमेकांशी चर्चा करतात. तसेच एकमेकांचा सल्ला घेतात.इंद्रनेल लवकरच गुलाम या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेतील त्याची भूमिका ही पाहुण्या कलाकाराची असली तरी कथानकाच्या दृष्टीने ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्याच्या व्यक्तिरेखेमुळे या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. या मालिकेत इंद्रनेल कमांडोची भूमिका साकारत आहे. ही भूमिका स्वीकारण्याआधी त्याने बरखासोबत या भूमिकेबाबत चर्चा केली असे तो सांगतो. या त्याच्या मालिकेविषयी बोलताना इंद्रनेल सांगतो, "या मालिकेचे निर्माते सौरभ तिवारी यांच्यासोबत माझे खूपच चांगले नाते आहे. त्यांच्या एका मालिकेसाठी पूर्वी मी ऑडिशन दिले होते. पण काही कारणांमुळे ही मालिका सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे मला या मालिकेसाठी विचारण्यात आले तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता मालिका करण्यासाठी होकार दिला. खरे तर या मालिकेतील माझी भूमिका खूपच छोटी आहे. पण ही भूमिका महत्त्वाची असल्याने मी स्वीकारली. या मालिकेतील कलाकारांसोबत मी पूर्वी काम केले नसल्याने त्यांच्यासोबत काम करण्यास मी खूपच उत्सुक आहे."