पुन्हा एकदा निया शर्माच्या लिपस्टीकवर होतेय चर्चा,सोशल मीडियावर उमटल्या अशा प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 8:42 AM
आपल्या स्टाइलसाठी प्रसिध्द असलेली टीव्ही अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे.सध्या ती वेब सीरीज 'टि्वस्टेड-2' मध्ये व्यस्त आहे.मात्र ...
आपल्या स्टाइलसाठी प्रसिध्द असलेली टीव्ही अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे.सध्या ती वेब सीरीज 'टि्वस्टेड-2' मध्ये व्यस्त आहे.मात्र नियाचे नाव चर्चेत येण्यासाठी वेबसिरिज नाहीतर तिच्या विचित्र मेकअपमुळे चर्चेत आहे.नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.यामध्ये ती तिने ग्रीन कलरची लिपस्टिक लावली आहे.नियाच्या या लूकला खुप ट्रोल केले जात आहे.इतकेच नाही तर एका नेटीझन्सने तिला चेटकीण म्हटले आहे.नियाला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंट विषयी ट्रोल केले जाते.नियाला या गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचे तिने म्हटले आहे.तर काहींनी वा तेरी डेअरिंग, मान गये यार!!अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत.नियाचा हा मेकअप एक्सप्रिमेंटची मात्र सोशल मीडियावर चांगलीच टर उडवली जात आहे.निया 'ट्विस्टेड’च्या दुस-या सीझनमध्ये झळकणार आहे.या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये निया बिनधास्त अंदाजात दिसली होती.दुस-या सीझनमध्ये ती त्यापेक्षाही बोल्ड अन् बिनधास्त अंदाजात दिसणार आहे.नियाला मात्र बोल्ड हा शब्दप्रयोग करणे आवडत नाही.यांवर तिने मीडिया ‘बोल्ड’ हा शब्द का वापरतो हे मला कळत नाही. विशेषत: माझ्याबदद्ल तरी मला हा शब्द मान्य नाही.याला ‘बोल्ड’ नाही तर ‘स्टाईल’ म्हणतात. यात मी जे काही पात्र साकारले आहे, तिच्याकडून तुम्ही साडी वा सूट घालण्याची अपेक्षा करू शकत नाही. ‘ट्विस्टेड2’मध्ये मी माझ्या कपड्यांवर बरेच लक्ष दिले आहे, हे खरे आहे. लोक त्याला बोल्ड म्हणणार असतील तर ठीक आहे असे नियाने म्हटले आहे.विक्रम भट्ट यांनी ‘ट्विस्टेड’ वा ‘ट्विस्टेड2’ दिग्दर्शित केलेल्या नाहीत. तर लिहिलेल्या आहेत. पण असे असूनही त्यांनी मला प्रचंड प्रोत्साहन दिले.निया तू हे करू शकतेस,अशा शब्दांत त्यांनी माझ्यातील आत्मविश्वास उंचावला. खास मला डोळ्यापुढे ठेवून त्यांनी माझ्यासाठी भूमिका लिहिली.भविष्यात मला खूप प्रोजेक्ट मिळतील. पण खास माझ्यासाठी भूमिका लिहिली जाणे, हे मी माझे नशीब मानते. यासाठी मी त्यांचे आभारी आहे.असेही तिने सांगितले. नुकतंच निया शर्माच्या 'ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्च झाला आहे.यावेळी तिने स्लिट गाउन आणि हॉट पँट परिधान केले होते.पण हाच डिझायनर ड्रेस नियासाठी मात्र डोकेदुखी ठरला. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली.यामुळे निया भलतीच नर्व्हस झाली.तिचा नर्व्हसनेस पाहून ती या वेब सीरिजमुळे नर्व्हस असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र खुद्द नियाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.अनेकदा ट्रायल घेऊन देखील ड्रेसमध्ये काही कमतरता राहून गेली.त्यामुळे या वेब सीरिजमुळे नाही तर या ड्रेसमुळे नर्व्हस झाल्याचे तिने स्पष्ट केले आहे.