Join us

Yes I Will Marry You, दिशा परमारने नॅशनल टेलिव्हिजनवर राहुल वैद्यला दिला होकार, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 19:05 IST

प्रोमोमध्ये राहुल आणि दिशा दोघांचे रोमँटीक क्षण पाहायला मिळत आहे. राहुल आणि दिशा एकमेकांना किस करताना पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस १४' मधून गायक राहुल वैद्यची लव्हस्टोरी जगासमोर आली. अभिनेत्री दिशा परमारसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉसशोमध्ये दिली होती. राहुलनेच  नाही तर दिशानेही लग्नासाठी होकार दिला आहे. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची एका मित्राद्वारे ओळख झाली होती. एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची ओळख झाली होती.

विशेष म्हणजे पहिल्या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली. दिशा परमार बिग बॉसच्या घरात राहुलला भेटण्यासाठी गेली होती. दोघांनीही  'याद तेरी' म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. तेव्हापासून दोघांमध्ये जवळीक वाढली होती. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. आजपर्यंत दोघांनी कधीच आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली नव्हती.  

११ नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस होता. या खास प्रसंगी राहुलने टीव्हीवरून दिशाला लग्नाची मागणी घातली होती. तेव्हापासून राहुल आण दिशा नवीन लव्हबर्डची चर्चा सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर राहुल वैद्यसाठी दिशाची घरात एंट्रीने घरातही प्रेमाचे वारे वाहु लागले आहेत.

 

नुकताच शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये राहुल आणि दिशा दोघांचे रोमँटीक क्षण पाहायला मिळत आहे. राहुल आणि दिशा एकमेकांना किस करताना पाहायला मिळत आहे. दिशानेही लग्नासाठी होकार दिलाय त्यामुळे राहुल वैद्यची अवस्था नक्कीच ''आज मै उपर, आसमाँ निचे अशीच झाली'' असणार हे मात्र नक्की.

Bigg Boss 14 : राहुल वैद्यसोबत कधी लग्न करणार दिशा परमार? अभिनेत्रीने दिली पहिली प्रतिक्रिया

२०२१ मध्ये ती राहुलसोबत लग्न करणार का असा प्रश्न विचारल्यावर, दिशा म्हणाली, ''जेव्हा मी यासाठी तयार होईन, तेव्हा मी यावर बोलेन. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्याबद्दल बोलेन. तेव्हा मी त्याबद्दल बरेच काही सांगेन.दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. 'प्यार का दर्द' या टीव्ही शोमध्ये दिशाने काम केले आहे.

अभिनयात सुद्धा राहुलने आजमावले नशीब 

सोनू निगम, मीका सिंग आणि शानसारखे राहुल वैद्यने सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत.

टॅग्स :बिग बॉस १४