Join us

Bigg boss ott फेम दिव्या अग्रवाल लग्नापूर्वीच होती प्रेग्नंट? अभिनेत्रीने उत्तर देत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 15:29 IST

Divya agarwal: दिव्याच्या लग्नातील फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी तिला तिच्या प्रेग्नंसीविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामुळेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या अग्रवाल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत येत आहे. दिव्याने २० फेब्रुवारी रोजी तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकर याच्यासोबत लग्न केलं. या लग्नसोहळ्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत आली. परंतु, या लग्नात तिची जितकी चर्चा झाली. तितकाच तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. दिव्या लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती असं म्हणत अनेकांनी तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर, आता दिव्याने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

सोशल मीडियावर सध्या दिव्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिव्याने तिच्या लग्नात एक छान डान्स केला होता. परंतु, तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला तू प्रेग्नंट आहेस का? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामुळेच दिव्याने आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

काय आहे दिव्याची पोस्ट?

"इतकी जाड का आहेस, इतकी बारीक का आहेस, इतका काळा का, इतकी कमी उंची का, एवढा उंच का? बास करा. सुंदर दिसतायेत. दरवेळी फालतू बडबड करायची काहीही गरज नाहीये," अशी खोचक नोट लिहित तिने ट्रोलर्सला सुनावलं आहे.दरम्यान, दिव्या आणि अपूर्व हे दोघं जवळपास ९ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. दिव्या हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसंच ती बिग बॉस ओटीटी १ ची विजेती सुद्धा आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीबिग बॉसटिव्ही कलाकार