Join us

दिव्यांका त्रिपाठीचा एक्स बॉयफ्रेंड अखेर अडकणार लग्नाच्या बेडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 10:19 AM

फॅशन डिझायनर रिपसी भाटीयासह तो लग्न करणार असल्याची गुड न्युज खुद्द शरदनेच चाहत्यांना दिली आहे. 

सेलिब्रेटींवर रसिकांचं प्रेम इतकं असतं की त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे याबाबत जाणून घेण्यास ते उत्सुक असतात. मग ते त्याचं अफेअर असो किंवा मग लग्नाच्या चर्चा. आता लवकरच दिव्यांका त्रिपाठीचा एकेकाळचा बॉयफ्रेंड अभिनेता शरद  मल्होत्रा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. फॅशन डिझायनर रिपसी भाटीयासह तो लग्न करणार असल्याची गुड न्युज खुद्द शरदनेच चाहत्यांना दिली आहे. 

विशेष म्हणजे टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि शरदचे अफेअर खूप गाजले होते. दिव्यांका आणि शरद हे एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे. दिव्यांकाला शरदसह लग्न करत आयुष्याची नवी सुरूवात करण्याची इच्छा होती मात्र शरद त्यावेळी लग्नासाठी तयार नव्हता. याच कारणामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघेही वेगळे झाले. दिव्यांकानंतर शरद मल्होत्राच्या आयुष्यात पूजा बिष्ट आली. या दोघांचेही अफेअर खूप गाजले.  मात्र दोघांचेही नाते फार काळ टिकू शकले नाही. पूजा आणि शदर यांचे अफेअर हे केवळ 2 वर्ष टीकले. यावेळी शरदच्या विचीत्र वागण्याला वैतागुन पूजाने शरदसह ब्रेकअप केले होते. पूजासह अफेअर असताना त्याचे दुस-या मुलीबरोबरही अफेअर सुरु असल्याचे पूजाचे म्हणणे होते. आणि त्यामुळेच पूजा आणि शरद यांचे ब्रेकअप झाले. 

शरद त्याच्या करिअर पेक्षा त्याच्या अफेअरमुळेच जास्त चर्चेत राहिला.  यानंतर शरद रिपसी भाटीयाच्या संपर्कात आला. दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता शरदने त्याच्या या नव्या नात्याला नवी ओळख देण्याचे ठरवलेले दिसते. तुर्तास सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठी