Join us

दिव्यांका त्रिपाठीला वाटायची 'या' गोष्टीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 2:36 PM

दिव्यांकाला उंच जागेची खूप भीती वाटते. मात्र या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी तिने आपल्या या भीतीवर मात करत एका जायंट व्हीलमध्ये बसून केले.

यंदाचा ‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळा’ हा आजवर कधी न पाहिलेल्या थरारक प्रात्यक्षिके, आणि अफलातून नृत्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिव्यांकाला उंच जागेची खूप भीती वाटते. मात्र या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी तिने आपल्या या भीतीवर मात करत एका जायंट व्हीलमध्ये बसून केले.

आत्मविश्वासपूर्ण निवेदन आणि स्मितहास्य दाखवत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या दिव्यांकाकडे पाहून कोणीही ही कल्पना केली नसती की तिला उंच जागेची भीती वाटत असावी. ही गोष्टही तिने कार्यक्रम संपल्यावर सर्वांना सांगितली. दिव्यांका म्हणाली, “मला उंच जागांची प्रचंड भीती वाटते. उंच जागी आल्यावर माझे पाय लटपटायला लागतात आणि तळहाताला घाम फुटतो. मला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एका जायंट व्हीलमध्ये बसून करायचं आहे, असं जेव्हा मला सांगण्यात आलं, तेव्हा माझ्या मनात दोन भावना निर्माण झाल्या- एक भीतीची आणि दुसरी थरारकतेची. मला पहिल्यापासूनच जायंट व्हीलमध्ये बसून गोल फिरावं, असं वाटत होतं. त्यामुळे ही संधी माझ्याकडे चालून येताच मी ती लगेच होकार दिला.  पण सर्वप्रथम मी जायंट व्हीलमध्ये बसले, तेव्हा क्षणभरच भीतीने माझ्या डोळ्यापुढे काळोख आला. माझा सहकलाकार आणि सह-सूत्रधार झेन इमाम याला माझ्या या भीतीची कल्पना असल्याने तो सतत मला धीर देत होता. कधी काही गोष्टी सांगून, तर कधी काही करून तो माझं लक्ष भीतीच्या भावनेपासून दुसरीकडे वेधत होता. त्यामुळेच मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करू शकले. जायंट व्हीलमध्ये बसून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं हा माझ्यासाठी एक धाडसी स्टंटप्रसंगच होता; पण मला ते करताना फार मजा आली. या कार्यक्रमामुळे मला माझ्या उंच जागांच्या भीतीवर मात करता आली.”

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीस्टार प्लस