Join us

'तुम्हाला हे मान्य आहे का', अक्षया नाईकच्या व्हिडीओने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:29 AM

अक्षया नाईकच्या पायाला दुखापत झाली आहे. ’पायाला दुखापत झाल्याने अक्षयासाठी  शूट करणे सोपे नाही. कधी घरी तर कधी सेटवरचे व्हिडीओ ती शेअर करताना दिसते.

कलाकारांना कोणतीही परस्थिती असो शूटिंग करावंच लागतं. अगदी दुखापत झालेली असली तरी त्यांना शूटिंग करावेच लागते. त्यातही मालिकेत काम करणारा कलाकार असला तर शूटिंग कधी संपेल याचीही वेळ नसते.  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत लतिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया नाईकला सध्या अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या सेटवरच तिला ही दुखापत झाली होती. या दुखापतीनंतरही आराम न करता अक्षयाने मालिकेचे शूटिग करणं थांबवलं नव्हतं. ती तेव्हाही काम करत होती. या दरम्यानचाही एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिलचेअरवर बसलेला अक्षया तो व्हिडीओ होता.अनेकांनी तिचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचे कौतुकच केले होते.

अक्षयाही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.अक्षयानं आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत.  त्यामुळे . ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. तिचा व्हायरल झालेल्या व्हिडीओत याची प्रचिती येईल.

अक्षया नाईकच्या पायाला दुखापत झाली आहे. ’पायाला दुखापत झाल्याने अक्षयासाठी  शूट करणे सोपे नाही. कधी घरी तर कधी सेटवरचे व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. नुकताच तिचा नवीन व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसतंय. घरी जेवण झाल्यानंतर निवांत झोपण्याआधी तिने एक मेजशीर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.'दुपारची झोप इज रिअल ड्रग, मान्य आहे का?', असा प्रश्न अक्षयानं व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना विचारला आहे.अक्षयानं हा व्हिडीओ शेअर करताच तिच्या चाहत्यांनीही तिच्या या कमेंटवर सहमती देताना दिसत आहे. 

टॅग्स :अक्षया नाईक