सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवरात्री निमित्त कलाकारांनी खास फोटोशूट केले आहे. दरम्यान मराठमोळ्या अभिनेत्रीने विदूषकाच्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. या वेशात तिला ओळखणं कठीण झालं आहे. ही अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade). अश्विनीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अश्विनी महांगडे हिने नवरात्रीनिमित्त अभिनयातील रसाची ओळख करून दिली आहे. हास्य रससाठी तिने विदुषकाचा लूक केला आहे. या वेशात तिला ओळखता येत नाही. तिने फोटो शेअर करत लिहिले की, हास्या_विण_रंग_सारे_करडे || करड्या रंगात दडलेले सगळे रंग या विदूषकाच्या चरणी सादर समर्पित ! ज्यांनी जोकर म्हणून सगळं आयुष्य लोकांना हसविण्यासाठी समर्पित केलं त्या सर्वांना आमच्या टीमकडून मानवंदना !!! अश्विनीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
वर्कफ्रंट...अश्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपली छाप उमटविली आहे. तिने ‘आधी बसू मग बोलू’, ‘गोलपिठा’ या नाटकात काम केले आहे. ‘अस्मिता’ या मालिकेत ‘मनाली’ची भूमिका तिने केली. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणूअक्काची भूमिका केली. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना दिसते आहे. याशिवाय तिने बॉईज, टपाल, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर या चित्रपटात झळकणार आहे.