Join us  

'नवा गडी..'मधील 'आनंदी'चे वडील दिसले होते 'दृश्यम'मध्ये; रोल छोटाच, पण महत्त्वाचा...आठवतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 12:15 PM

'नवा गडी नवं राज्य'मधील आनंदीचे वडील ब्लॉकबस्टर बॉलिवूड सिनेमात झळकले होते. सध्या चर्चेत असणाऱ्या दृश्यम-२ च्या पहिल्या भागात त्यांनी एक भूमिका साकारली होती.

सध्या घराघरात बघितली जाणारी लोकप्रिय मराठी मालिका ती म्हणजे नवा गडी नवं राज्य. मालिकेची एकंदर कहाणी, ट्विस्ट, राघव-आनंदीची जोडी प्रेक्षक खूप पसंत करत आहेत. आनंदीच्या लग्नानंतर तिचे वडील मालिकेत अधेमधेच दिसतात. अभिनेते अभय खडपकर यांनी ही भूमिका साकारली आहे. त्यांनी बॉलिवूड सिनेमात साकारलेल्या भूमिकेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा सिनेमा साधासुधा नव्हता. २०० कोटींच्या क्लबमधला होता. 

२ आणि ३ ऑक्टोबर या दिवशी काय झालं होतं आठवतं ना? विजय साळगावकर आणि त्याचे कुटुंब पणजीला गेले होते. स्वामी चिन्मयानंद यांच्या सत्संगसाठी आणि त्यांनी पावभाजीही खाल्ली होती. आता ओळखले असेल. बरोबर! दृश्यम सिनेमात अजय देवगण त्याच्या कुटुंबासोबत बसने पणजीला गेल्याचे दाखवले आहे. बसने परत येताना त्यांची ओळख बस कंडक्टरशी होते. अजय देवगणची छोटी मुलगी अनुसोबत तर कंडक्टरची चांगलीच गट्टी जमते. हे कंडक्टरच तर आहेत आपल्या आनंदीचे वडील. 

'दृश्यम-२' सध्या चर्चेत आहे. बऱ्याच काळाने बॉलिवूडच्या सिनेमाची चर्चा होतेय आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाईही करतोय. या सिनेमाच्या पूर्वार्धात दृश्यमचे संदर्भ येतात. त्यात बसमधील प्रवास दिसतो आणि तेव्हाही कंडक्टरच्या भूमिकेतील अभय खडपकर यांची झलक दिसते. 'दृश्यम'मध्ये सॅमच्या खुनाची चौकशी करताना, पोलीस या बस कंडक्टरचाही जबाब घेताना दाखवले आहेत.   

'दृश्यम' सिनेमात सर्वांच्याच भूमिका गाजल्या आहेत. त्यात अभय खडपकर यांची भूमिका छोटी होती, पण कथेच्या दृष्टीने महत्त्वाची होती. 'दृश्यम'चे दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी इतरही अनेक मराठी कलाकारांना या सिनेमात चांगल्या भूमिका दिल्या होत्या आणि सगळ्यांनीच त्या अगदी चोख बजावल्या.

टॅग्स :दृश्यम 2मराठी अभिनेताअजय देवगणहिंदीसिनेमा