Join us  

“चला हवा येऊ द्या” फेम निलेश साबळेच्या पत्नी विषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का? दिसायलाही आहे सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 1:53 PM

निलेश साबळेने २०११ साली पुण्याची मैत्रिण गौरीसोबत लग्न केलं. निलेश आणि त्याची पत्नी गौरी यांच्या प्रेमाची गोष्ट आगळीवेगळी ठरते.

‘कसे आहात सगळे, हसताय ना… हसायलाच पाहिजे’ म्हणत 'चला हवा येऊ द्या' या शोची धुरा डॉ. निलेश साबळे यशस्वीरित्या सांभाळत आहे. शोचं लेखन, स्वरुप, दिग्दर्शन ही जबाबदारी निलेशने समर्थपणे पेलली आहे. थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर आपल्या कुटुंबीयांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीना काही शेअर करत असतात. मात्र डॉ. निलेश साबळेबाबत फारसं काही समोर आलेलं नाही. त्यामुळेच आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. डॉ. निलेश व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एम. एस. पदवीधर आहे.आपलं लेखन, सूत्रसंचालन आणि विनोदवीरांच्या सोबतीने त्याने चला हवा येऊ द्या शोला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. 

निलेश साबळेने २०११ साली पुण्याची मैत्रिण गौरीसोबत लग्न केलं. निलेश आणि त्याची पत्नी गौरी यांच्या प्रेमाची गोष्ट आगळीवेगळी ठरते. 1० वर्षांपूर्वी रेशीमगाठीत अडकलेल्या निलेश आणि गौरीची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे निलेश एका कार्यक्रमानिमित्त गौरीच्या कॉलेजमध्ये गेला असता तिथं गौरीसोबत त्याची ओळख झाली. आणि तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. दोघं एकमेकांचे चांगले मित्र बनले, नंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

निलशेने डॉक्टरकी करण्यात काही रस नसल्याचे आधीच गौरीला सांगितले होते. गौरीचीही यावर काही हरकत नव्हती. त्यानंतर लग्नबंधनात अडकत सुखी संसाराला सुरुवात केली. करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी गौरी निलेशच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. निलेशच्या प्रत्येक निर्णयात गौरी त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. गौरी साबळे ह्या पदवीधर आहेत. अभिनय क्षेत्राचा आणि त्यांचा काहीही संबंध नसला तरी त्यांना मराठी नाटकं आणि मालिका पाहायला फार आवडतात.

त्यांच्या लग्नाचे फारसे कुणीही न पाहिलेले फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये डॉ. निलेश आणि गौरी मेड फॉर इच अदर असल्याचे पाहायला मिळत आहे. जन्मोजन्मीचे सोबती बनण्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळतो.  निलेश आणि गौरी दोघेही सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात. 'होम मिनिस्टर' सारख्या कार्यक्रमांमधून दोघेही रसिकांच्या भेटीला आल्यामुळे त्यांच्या विषयीच्या अनेक रंजक गोष्टी चाहत्यांना जाणून घेता आल्या. 

टॅग्स :चला हवा येऊ द्या