Join us

या क्युट मुलीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 18:31 IST

अनेक कलाकार आपल्या लहानपणीचे फोटो शेअर करत असतात.

अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो व्हायरल होताना दिसतात. आपले आवडते कलाकार लहानपणी कसे दिसायचे? याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोत  हातात बाहुलीसोबत बसलेली ही क्युट मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

विशेष म्हणजे फोटोत हसणारी ही गोड चिमुकली आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.काही दिवसांपूर्वी लवंगी मिरची मालिकेत दिसली होती. 

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून शिवानी बावकर आहे.. शिवानी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ते आपले फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सातत्याने शेअर करत असते. 

'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. या मालिकेत शिवानीने शितली ही भूमिका साकारुन तुफान लोकप्रियता मिळवली. अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे. 

टॅग्स :शिवानी बावकर