सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी अनेकदा त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच मध्यंतरी अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करत नवा ट्रेंड सुरु केला होता. यामध्येच आता एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो चर्चेत येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसत असलेली चिमुकली अभिनेत्री गिरिजा प्रभू आहे.फोटोत गिरीजा वडिलांच्या कडेवर दिसतेय.
गिरिजाचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दोन्ही पुण्यात झालं. गिरिजाला लहानपणापासूनच अॅक्टिंग आणि डान्सची आवड होती. गिरिजाच्या कुटुंबातून कुणीच या क्षेत्रात नाही. मात्र गिरिजाने डान्स क्लास जॉईन केला. शिवाय उन्हाळी, सुट्टीमध्ये एका शिबिरात सहभाग घेतला. तेव्हा तिने एक नाटक केलेलं. त्या मधून तिचा अॅक्टिंग मध्ये इंटरेस्ट वाढला मग डबिंगचा गिरिजाने कोर्स केला आणि मग त्यानंतर तिने हळूहळू आॅडिशन द्यायला सुरुवात केली.
सध्या गिरिजा सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरीची भूमिका साकरते आहे. कौल मनाचा, काय झालं कळंना , सेंट मेरी मराठी मिडीयम, डॅड चिअर्स , तुझा दुरावा हे तिचे काही गाजलेले चित्रपट. याबरोबरच तिने मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका आणि एक शॉर्ट फिल्म सुद्धा केली आहे.