Join us

‘कबीर सिंग’सिनेमात मोलकरणीच्या भूमिकेत दिसली होती ही मराठी अभिनेत्री ? नाव जाणून वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 16:01 IST

शाहिद कपूरची सिनेमात मुख्य भूमिका होती. शाहिदसोबतच वनिताची एक छोटीशी भूमिका होती. मोलकरणीच्या भूमिकेत ती झळकली होती.

एखाद्या भूमिकेमुळे लोकं कलाकारांना ओळखायला लागतात. भूमिका परफेक्ट व्हावी यासाठी कलाकारही प्रचंड मेहनत करतात. छोटीशी भूमिका असली तरी लवक्षेधी ठरते. भूमिका कोणतीही असो मिळालेल्या संधीचं सोनं करत कलाकार यशाची नवीन उंची गाठतात असेच काहीशी कमाल अभिनेत्री वनिता खरातनेही 'कबीर सिंग' सिनेमात केली होती.

शाहिद कपूरची सिनेमात मुख्य भूमिका होती. शाहिदसोबतच वनिताची एक छोटीशी भूमिका होती. मोलकरणीच्या भूमिकेत ती झळकली होती. भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी ठरली होती. आपल्या सहजसुंदर अभिनयाने वनिताने ही भूमिकाही गाजवली. याच भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. या भूमिकेनंतर तिने मागे वळून पाहिले नाही. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढतच गेली.सिनेमात अतिशय साध्या लूकमध्ये ती दिसली होती.

विनोदाचं जबरदस्त टायमिंग, ताकदीचा अभिनय महाराष्ट्राची हास्यजत्रा विनोदी कार्यक्रमातूनही  ती रसिकांना हसून हसून लोटपोट करत असते.घराघरात वनिता आज कमालीची लोकप्रिय आहे. मराठीच नाहीतर हिंदीतही तिने आपले अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे.

मात्र खऱ्या आयुष्यात वनिता फारच बोल्ड आहे. तिच्या चाहत्यांना आतापर्यंत यागोष्टीची प्रचिती आलीच असणार. न्युड फोटो शूट करत तिने अक्षरक्षः धुमाकुळ घातला होता. तेव्हापासून वनिता प्रचंड चर्चेत आली होती. फोटोशूटच्या माध्यमातून तिने जसे आहोत तसे स्वतःला स्विकारा आणि स्वतःवर प्रेम करा असाच संदेश दिला होता. अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. तिच्या विविध अंदाजामधील फोटो  शेअर करत अक्षरक्षः धुमाकुळ घालत असते.

अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्यानेही ती चाहत्यांची मनं जिंकत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. वनिताची सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. तिच्याविषयी सगळ्याच गोष्टी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो.

इतकेच काय तर सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला वनिताचे विविध अंदाज पाहायला मिळतील.प्रत्येक फोटोतील तिचा अंदाज ही तितकाच खास असतो. त्यामुळे तिच्या प्रत्येक अदा चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतात. 

टॅग्स :वनिता खरातशाहिद कपूर