'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घऱाघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारुन तो चर्चेत आला. मिलिंद गवळी कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे ते कायम चाहत्यांसोबत त्यांच्या जीवनातील अपडेट शेअर करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या जावयाविषयी एक पोस्ट लिहिली आहे.
मिलिंद गवळी यांनी फोटो शेअर करत म्हटले की, अहम ब्रह्मास्मी . आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, ज्या आपल्याला सहज जाणवतात, समजतात , कळतातही, पण बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात ज्या आपल्या अकलनाच्या पलीकडच्या असतात , आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात, मग आपण त्याला योगायोग म्हणतो, कधी कधी चमत्कारही म्हणतो, काही आठवड्यापूर्वी, माझ्या विजू मावशीच्या घरी, म्हणजे नाशिकला पुरकर काकांकडे, 58 ते 60 ब्रह्मकमळ एकावेळी एकत्र उमलले, त्याचा व्हिडिओ मावशीने पाठवला, एकवेळेला ऊमललेले इतकी ब्रम्हकमळा ची फुलं , हे फारच सुंदर दृश्य होतं ते . ते दृश्य डोळ्यासमोर होतं.
दोन-चार दिवसांनी, मी पण एक ब्रम्हकमळाचं रोप घरी घेऊन आलो, कधीतरी आपल्याकडेही ब्रह्मकमळ येतील अशा आशेने ते मी आणलं, संध्याकाळी बसून ते एका कुंडीमध्ये लावलं, दुसऱ्या दिवशी सकाळी स्टार प्रवाह मधुन निरोप आला, यावर्षी गणपती महोत्सवामध्ये माझा परफॉर्मन्स आहे असं त्यांनी मला सांगितलं, मी चौकशी केल्यानंतर मला कळलं की दत्तगुरूंच्या आरती वर एक ॲक्ट आहे. आणि त्यामध्ये मला ब्रम्हाची भूमिका करायची आहे. मी एका झटक्यात तयार झालो. आणि डोक्यामध्ये विचार आला, काल कुंडीमध्ये लावलेल्या ब्रह्मकमळाचं रोप आणि या ब्रह्म भूमिकेचा काही संबंध असेल का ? असेलं ही ! असू शकतं, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.