Join us

सुर्यास्त पाहणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? पहिल्याच मालिकेतून गाजवली मराठी इंडस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 16:21 IST

Marathi actress: ही अभिनेत्री मराठी कलाविश्वासह सोशल मीडियावरही बरीच सक्रीय आहे.

आपल्यापासून कोसोदूर असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्यासाठी आज प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करतो. यात कलाकार मंडळीतर सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ही कलाकार मंडळी त्यांच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होतोय.

मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सुर्यास्ताकडे पाहात पाठमोरी उभी आहे. तिचा हा फोटो पाहिल्यावर अनेक  जण ती कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न नेटकरी करतायेत. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने लागीरं झालं जी या गाजलेल्या मालिकेत काम केलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो अभिनेत्री शिवानी बावकर हिचा आहे. 'लागीरं झालं जी' या मालिकेतून शिवानी नावारुपाला आली. या मालिकेत तिने शितली ही मुख्य भूमिका साकारली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनशिवानी बावकरसेलिब्रिटीटिव्ही कलाकार