Join us

फोटोतील या गोंडस चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 07:00 IST

अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता या यादीत आणखी एका स्टारच्या नावाची भर पडली आहे.

आपल्या लाडक्या कलाकारांचे फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतात. खासकरून सेलेब्सचे ते फोटो लाइक केले जातात जे न पाहिलेले असतात. अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता या यादीत आणखी एका स्टारच्या नावाची भर पडली आहे. एका गोंडस चिमुरडीचा फोटो चर्चेत आला आहे. हा फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्रीचा आहे. फोटो पाहून तुम्हालाही या अभिनेत्रीला ओळखता आलं नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो.

फोटोतील ही चिमुरडी दुसरी तिसरी कुणी नसून आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आहे. तिच्या या बालपणीच्या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte) मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणीला अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे.

मधुराणी प्रभुलकरने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. आई कुठे काय करते या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेत झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिका