Join us

'रामायण'मधील 'जामवंत' आठवतोय का?, ३६ वर्षांनंतर आता अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 10:36 AM

Ramayana : 'रामायण'मध्ये राम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्याशिवाय आणखी एक व्यक्तिरेखा होती, ज्याच्या आवाजाने प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. आम्ही 'रामायण'मध्ये जामवंतची भूमिका साकारणाऱ्या राजशेखर उपाध्याय यांच्याबद्दल बोलत आहोत.

रामानंद सागर यांच्या 'रामायण'(Ramayana) मधील प्रत्येक पात्र आजही लोकांच्या मनात घर करुन कायम आहे. या पात्रांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. 'रामायण'मध्ये राम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्याशिवाय आणखी एक व्यक्तिरेखा होती, ज्याच्या आवाजाने प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. आम्ही 'रामायण'मध्ये जामवंतची भूमिका साकारणाऱ्या राजशेखर उपाध्याय (Raj Shekhar Upadhyay) यांच्याबद्दल बोलत आहोत. 

जामवंतच्या भूमिकेतील त्यांच्या आवाजाने सर्वच प्रेक्षकांचे चाहते बनले. राजशेखरला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. राजशेखर उपाध्याय हे सुरुवातीपासूनच रंगभूमीशी संबंधित होते आणि ते रामलीलामध्येही सहभागी होत असत. श्रीकांत राजशेखर उपाध्याय हे जामवंत या व्यक्तिरेखेसाठी ओळखले जातात, पण आजही त्यांचा खरा चेहरा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, अभिनेत्याचे नवीन फोटो समोर आले आहेत.

या फोटोत श्रीकांत राजशेखर उपाध्याय हे प्रेमानंद जी महाराज यांच्या दरबारात दिसतात. यामध्ये अभिनेता गुरुजींना भेटताना दिसत आहे. या भेटीत गुरुजींनी श्रीकांत यांचे कौतुक केले. तसेच अभिनेत्याला जामवंतच्या आवाजातील संवाद ऐकवण्याची विनंती केली. राजशेखर जेव्हा बनारसमध्ये शिकत होते तेव्हा ते रामनगरच्या प्रसिद्ध रामलीलामध्ये काम करायचे असे म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार जामवंत यांनी द्वापर युगात कोहिनूर हिरा घातला होता. या हिऱ्याला तेव्हा स्यमंतक मणि असे म्हटले जात होते.

टॅग्स :रामायण