Join us  

'हम पांच'मध्ये फोटोतून बोलणारी अभिनेत्री आठवतेय का?, कमी वयात जग सोडून निघून गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 5:53 PM

ही अभिनेत्री देशातील पहिली टीव्ही स्टार बनली. छोटा पडदा असो किंवा मोठा, प्रत्येक क्षेत्रात तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

ती देशातील पहिली टीव्ही स्टार बनली. छोटा पडदा असो किंवा मोठा, प्रत्येक क्षेत्रात तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. आम्ही बोलत आहोत प्रिया तेंडुलकर (Priya Tendulkar) बद्दल, जी एक उत्कृष्ट अभिनेत्री तसेच एक उत्तम लेखिका होती. आज तिची जयंती असून प्रिया तेंडुलकरच्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

१९ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबईत जन्मलेल्या प्रिया तेंडुलकरने भलेही या जगाचा निरोप घेतला असेल, परंतु तिने विविध टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिच्या चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले, जे आजही कायम आहे. प्रियाचे वडील विजय तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार होते. यामुळेच प्रियाचा लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता आणि अभ्यासासोबतच तिने अभिनयाच्या जगातही प्रवेश केला.

या मालिकेतून प्रत्येक घराघरात प्रसिद्धी मिळवलीप्रिया तेंडुलकरने बासू चॅटर्जी यांच्या 'रजनी' या शोमधून टीव्हीच्या जगात पहिले पाऊल ठेवले, ज्यामध्ये तिने रजनीची भूमिका साकारली होती. यानंतर ती दामिनी आणि अस्मिता इत्यादी मालिकांमध्ये दिसली. मात्र, हम पांच या मालिकेने तिला घराघरात प्रसिद्धी दिली. वास्तविक, या मालिकेत तिने एका मृत महिलेची भूमिका साकारली आहे आणि ती भिंतीवरील फोटोतून आपल्या पतीशी बोलत राहते.

मोठ्या पडद्यावरही झळकलीप्रियाने अनेक चित्रपटांमध्येही तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. १९७४ साली अंकुर या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. याशिवाय तिने मिनचीना ओटा, गोंधळात गोंधळ, थोरली जावू, शगुन, मोहरा, त्रिमूर्ती, गुप्त, और प्यार हो गया, प्रेम शास्त्र, राजा को रानी से प्यार हो गया इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले.

असे होते प्रिया तेंडुलकरचे आयुष्यटीव्ही शो रजनीमध्ये काम करत असताना प्रियाची भेट सीरियल लेखक करण राजदानशी झाली. त्याचवेळी करणने या मालिकेत रजनीच्या पतीची भूमिकाही साकारली होती. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि १९८८ मध्ये करण आणि प्रियाचे लग्न झाले. मात्र, सात वर्षांनंतर त्यांचे नाते संपुष्टात आले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. १९ सप्टेंबर, २००२ रोजी प्रियाने हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतला.