टीव्हीवर अनेक मालिका येतात आणि जातात. यातील कलाकार आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करतात. या कलाकारांसोबतच बालकलाकारदेखील घराघरात लोकप्रिय होतात. स्मृती इराणींची लोकप्रिय मालिका क्यूंकी सास भी कभी बहू थी (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) बंद होऊन बराच काळ उलटला आहे. मात्र तरीही या मालिकेने आणि त्यातील पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत चिंकी जैसवाल(Chinky Jaiswal)ने बालकलाकार भूमीची भूमिका साकारली होती. ही छोटीशी भूमी जेव्हा जेव्हा बोलली तेव्हा लोकांची मने जिंकली. आता ही चिमुरडी मोठी झाली असून अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहून तिला ओळखणे फार कठीण झाले आहे.
चिंकी जैसवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज काहीतरी शेअर करत असते. ती तिच्या मालिकेचे फोटोही शेअर करत असते. ती दररोज तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते ज्यावर तिचे चाहते खूप कमेंट करत असतात. एका चाहत्याने लिहिले की, ओहह करण आणि भूमी. तर दुसऱ्याने लिहिले, तू खूप सुंदर दिसत आहेस भूमी. तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
या मालिकेत केलंय कामक्युंकी सास भी कभी बहू थी व्यतिरिक्त चिंकीने पृथ्वीराज चौहानमध्येही काम केले आहे. तिने या शोमध्ये राजकुमारी प्रथाची भूमिका साकारली होती. ती तिच्या खोडकर बोलीने सगळ्यांची मने जिंकायची. तिचा पारंपारिक अवतार खूपच गोंडस होता. चिंकी आता सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट देत असते. ती तिच्या व्हॅकेशन्सचे फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते. सध्या चिंकी अभिनयाच्या जगापासून दूर आहे.